New Rules: 1 ऑक्टोबरपासून खिशाला झटका? ATM ते LPGपर्यंत 5 मोठे नियम बदलणार

Big Rule Changes From October 1: 1 ऑक्टोबर 2026 पासून SBIच्या काही ग्राहकांसाठी ATM व्यवहारांची मोफत मर्यादा, LPG सब्सिडीसाठी आधार बायोमेट्रिक पडताळणी आणि NPSच्या शुल्करचनेत बदल होणार आहेत.
Big Rule Changes From October 1
Big Rule Changes From October 1Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Rules From October 1 : नवीन महिना सुरू होताच आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही नियम बदलणार आहेत. 1 ऑक्टोबर 2026 पासून SBIच्या काही ग्राहकांसाठी ATM व्यवहारांची मोफत मर्यादा, LPG सब्सिडीसाठी आधार बायोमेट्रिक पडताळणी आणि NPSच्या शुल्करचनेत बदल होणार आहेत.

याशिवाय मोठ्या रकमेच्या FDच्या व्याजदरांबाबत बँकांना अधिक पारदर्शक माहिती द्यावी लागणार आहे. तर 15 ऑक्टोबरपासून ₹2,000 पेक्षा अधिकच्या काही UPI व्यापारी व्यवहारांवर MDR लागू होणार आहे.

LPG सब्सिडीसाठी आधार बायोमेट्रिक महत्त्वाचे

स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी सब्सिडी सुरू ठेवायची असल्यास ग्राहकांनी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. 1 ऑक्टोबरपासून ही पडताळणी न केलेल्या ग्राहकांना अनुदानित दराचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. गॅस एजन्सी किंवा उपलब्ध अधिकृत माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

SBIच्या ATM व्यवहारांची मोफत मर्यादा घटणार

SBIच्या Salary Package Account धारकांसाठी 1 ऑक्टोबरपासून महत्त्वाचा बदल आहे. इतर बँकांच्या ATMमधून महिन्याला करता येणाऱ्या मोफत व्यवहारांची संख्या 10 वरून 5 करण्यात येणार आहे. या पाच व्यवहारांमध्ये पैसे काढण्याबरोबरच बॅलन्स तपासणीसारख्या गैर-आर्थिक व्यवहारांचाही समावेश असेल. SBIच्या स्वतःच्या ATM नेटवर्कवरील सुविधा मात्र सुरू राहतील.

Big Rule Changes From October 1
Nilesh Ghaywal: फिर्यादीनं कोर्टातच फिरवली साक्ष! गुंड निलेश घायवळ प्रकरणाचा निकाल; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

NPS खातं उघडताना ₹200 शुल्क

National Pension System (NPS) आणि NPS Liteमध्ये Point of Presenceच्या माध्यमातून नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठी 1 ऑक्टोबरपासून नवीन शुल्करचना लागू होणार आहे. प्रत्येक PRANसाठी एकदाच ₹200 ऑनबोर्डिंग शुल्क आकारले जाईल. पूर्णपणे डिजिटल पद्धतीने खाते उघडल्यास काही परिस्थितीत कमी शुल्काची तरतूदही आहे.

Big Rule Changes From October 1
Maharashtra ST E-Bus: 'लालपरी' आता धूर सोडणार नाही! 2037 पर्यंत एसटी होणार ई-बस

मोठ्या FDच्या व्याजदरांची रोज माहिती

बल्क FD अर्थात मोठ्या ठेवींशी संबंधित नियमही बदलत आहेत. 1 ऑक्टोबरपासून बँकांना अशा ठेवींचे लागू व्याजदर त्यांच्या वेबसाइटवर प्रत्येक कामकाजाच्या दिवशी प्रसिद्ध करावे लागतील. समान रक्कम आणि समान कालावधीच्या ठेवींसाठी त्याच दिवशी सर्व शाखांमध्ये समान दर ठेवण्याचा नियम असेल. हा बदल प्रामुख्याने मोठ्या ठेवींशी संबंधित असून सामान्य रिटेल FDवर त्याचा थेट परिणाम होणार नाही.

Big Rule Changes From October 1
Mamata Banerjee: पोटनिवडणुकीपूर्वी TMCमध्ये खिंडार; ममता बॅनर्जींना धक्का, 100 हून अधिक नेते काँग्रेसमध्ये

15 ऑक्टोबरपासून UPIच्या नियमात बदल

UPI वापरणाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा बदल 15 ऑक्टोबरपासून होणार आहे. ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant व्यवहारांवर 0.4 टक्के MDR आकारला जाणार आहे. मात्र हे शुल्क ग्राहकाकडून नव्हे, तर संबंधित व्यापाऱ्याकडून आकारले जाणार आहे. ₹2,000 पर्यंतचे P2M व्यवहार आणि व्यक्ती-ते-व्यक्ती UPI व्यवहारांवर हा MDR लागू होणार नाही. त्यामुळे ऑक्टोबरपासून बँकिंग, गॅस सब्सिडी, पेन्शन खाते आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित बदल ग्राहकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com