Nilesh Ghaywal: फिर्यादीनं कोर्टातच फिरवली साक्ष! गुंड निलेश घायवळ प्रकरणाचा निकाल; पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

Nilesh Ghaywal Extortion Case: निलेश घायवळ सध्या देशाबाहेर फरार असतानाही त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल लागला आहे. आरोपींच्या अनुपस्थितीत निकाल लागल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
Gangster Nilesh Ghaywal
Gangster Nilesh Ghaywalsarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Crime News: देशातून फरार असलेला निलेश घायवळ याला कारागृहात असताना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठा न्यायालयीन दिलासा मिळाला आहे. पुण्यातील मोका न्यायालयाने या प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे, निलेश घायवळ सध्या देशाबाहेर फरार असतानाही त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल लागला आहे. आरोपींच्या अनुपस्थितीत निकाल लागल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

नेमके प्रकरण काय?

सन २०२० मध्ये निलेश घायवळ हा दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहात असताना खंडणी मागितल्याचा हा प्रकार घडल्याचा आरोप होता. संतोष धुमाळ याने फिर्यादीकडे भावाच्या रॅलीसाठी जीप हवी असल्याचे सांगत खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी या प्रकरणाचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला होता.

या प्रकरणात पुढे महत्त्वाचे वळण आले. फिर्यादीने पोलिस आणि तपास यंत्रणेवर गंभीर आरोप करत, दबाव टाकून आपली फिर्याद नोंदवून घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आपली बाजू मांडली होती.

उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

फिर्यादीने केलेल्या आरोपांची दखल घेत उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच फिर्यादीचा पुन्हा एकदा जबाब नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नोंदविण्यात आलेल्या जबाबात फिर्यादीने कथित खंडणीचा संपूर्ण घटनाक्रम नाकारला. आपल्यासोबत अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.

Gangster Nilesh Ghaywal
Maharashtra ST E-Bus: 'लालपरी' आता धूर सोडणार नाही! 2037 पर्यंत एसटी होणार ई-बस

त्यानंतर हा खटला मोका न्यायालयात न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयात चालला. सुनावणीदरम्यान फिर्यादीने पुन्हा एकदा संपूर्ण फिर्याद नाकारली. गुन्हे शाखा आणि तपास यंत्रणेने दबाव टाकून आपली फिर्याद नोंदवून घेतल्याचे सांगत, न्यायालयात शपथेवर कथित घटना घडलीच नसल्याचे नमूद केले.

या प्रकरणातील इतर साक्षीदार आणि पंचांनीही कथित घटनाक्रमाला दुजोरा दिला नाही. त्यामुळे खटल्याच्या सुनावणीत अभियोग पक्षाच्या पुराव्यांसमोर महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले होते. अखेर मोका न्यायालयाने निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Gangster Nilesh Ghaywal
Mamata Banerjee: पोटनिवडणुकीपूर्वी TMCमध्ये खिंडार; ममता बॅनर्जींना धक्का, 100 हून अधिक नेते काँग्रेसमध्ये

या निकालानंतर आरोपींचे वकील ॲड. विपुल दुशिंग यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. अशा प्रकारचे निकाल हे सुदृढ न्यायव्यवस्थेचे प्रतीक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच न्यायव्यवस्थेचे आभार मानले.

निलेश घायवळ टोळीविरुद्ध अलीकडच्या काळात दाखल झालेल्या अन्य गुन्ह्यांच्या संदर्भातही उच्च न्यायालयात ॲड. विपुल दुशिंग यांच्या वतीने घायवळ आणि इतर आरोपींनी रिट याचिका दाखल केल्या असल्याची माहिती देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com