Sarkarnama
मुंबई

Salman Khan : सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचा आधी आत्महत्येचा प्रयत्न अन् उपचारावेळी मृत्यू....

Salman Khan Firing Case : गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी अनुजला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.

Chetan Zadpe

Mumbai News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) याच्या घराच्या बाहेर गोळ्या झाडणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन या आरोपीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. आता उपचारादरम्यान अनुज थापन याचा मृत्यू झाल्याची बाब समोर येत आहे.

मुंबई पोलिसांकडून या वृत्ताला दुजोरा देत एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपी अनुजने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी अनुजला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी अनुजला मृत घोषित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील (Salman Khan) घराबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तर विरोधकांनी गोळीबाराच्या घटनेनंतर राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली होती.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सलमान खानशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यानंतर सलमानच्या घरी जाऊन भेटही घेतली. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी (Mumbai Police Commissioner) चर्चा करून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना केल्या होत्या. गोळीबारानंतर सलमान खानच्या घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बिष्णोई गँगने या हल्ल्याची जबाबदीरी स्वीकारली होती.

याआधीही सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या

अभिनेता सलमान खानला मागील अनेक वर्षांपासून गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. अशातच सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे. त्यामुळेच त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT