Vijay Wadettiwar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar - CM Shinde Meeting : सर्वात मोठी बातमी ! विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Maharashtra Politics : काही तासांपूर्वीच नार्वेकर-शिंदे यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी तिखट शब्दांत टीका केली होती .

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.अशातच राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपध्दती व दिरंगाई फटकारल्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात वर्षा बंगल्यावर बंद दाराआड गुप्त बैठक पार पडली.

या बैठकीवरुन शिंदे सरकारवर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी चांगलीच आगपाखड केली होती.पण या टीकेनंतर काहीच तासांत वडेट्टीवार हे मुख्यमंत्र्यांच्या तडकाफडकी वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहचले आहे.यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिंदेंच्या भेटीसाठी वडेट्टीवार हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण राजकीय वर्तुळात या भेटीमागच्या तर्क-वितर्कांना जोर पकडला आहे.पण राज्यात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

वडेट्टीवारांची घणाघाती टीका...?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी तिखट शब्दांत टीका केली होती. वडेट्टीवार म्हणाले, सगळा महाराष्ट्र बघतोय,यांची जाण्याची वेळ झालीय.आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ,त्यांचं आजचं मरण उद्यावर,उद्याचं परवावर ढकललं गेलं. तिरडी पण तयार आहे असल्याची टीकाही त्यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले,फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवलेलं आहे.व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला.त्यानंतर आता ते स्वत: काही तासांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.

शिंदे आणि नार्वेकरांमध्ये बंददाराआड चर्चा...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड यावेळी चर्चा झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. पण मतदारसंघातील विकासकामांसंबंधी ही बैठक असल्याचा दावा नार्वेकर यांनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT