Thane Politics : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन

Rashmi Thackeray News : टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले.
Rashmi Thackeray News
Rashmi Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात हजेरी लावली. या वेळी महिला ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन वर्षापूर्वी शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर या दोनही गटाकडून वारंवार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. मागील वर्षी देखील रश्मी ठाकरे ठाण्यात येणार म्हणून शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून (Shivsena) त्याचवेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर यंदा देखील बुधवारी रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली.

Rashmi Thackeray News
Ahmednagar BJP: भाजपची नगर शहर कार्यकारिणी जाहीर; विखे गटाला झुकते माप

यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून टेंभी नाक्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी या भागात असलेल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथे दुर्गेश्वरीची महाआरती केली. या आरतीनंतर महिला पदाधिकाऱ्यांशी जोरदार घोषणाबाजी करीत शक्ती प्रदर्शन केले.

या वेळी त्यांच्या समवेत ठाकरे गटाचे नेते तथा खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हा प्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग येथील काही ठिकाणी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर चंदनवाडी शाखेला भेट दिली. यावेळी शाखेत त्यांनी जवळ जवळ अर्धा तास महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Edited by : Amol Jaybhaye

Rashmi Thackeray News
Gadchiroli Crime : महागावात क्रोर्याची परिसीमा; परिवारातील पाच जणांच्या मृत्यूचे कारण उलगडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com