Pimpri-Chinchwad: पिंपरी महापालिका आवारात तुफान राडा; माजी नगरसेविकेचा पती अन् बिल्डरच्या मुलात हाणामारी

Pune News: बिल्डरच्या मुलाने चुलत्याला शिवीगाळ केल्याने नितीन यांनी त्याच्या कानशिलात ठेवून दिली.
Pimpri-Chinchwad News
Pimpri-Chinchwad NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: रस्त्यावरील हाणामारीचे लोण बुधवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत पोहाेचले. महापालिकेच्या आवारातच भाजपच्या माजी नगरसेविका सारिका बोराडे यांचे पती नितीन बोराडे आणि पटेल बिल्डरच्या मुलात शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यवसान अखेर हाणामारीत झाले.

बिल्डरच्या मुलाने चुलत्याला शिवीगाळ केल्याने नितीन यांनी त्याच्या कानशिलात ठेवून दिली. यामुळे पालिका आवारात गर्दीच्या वेळी मोठी धावपळ उडाली. नगरसेवक नसतानाही प्रशासकीय राजवटीतील मुद्दा सोडून झालेली ही गुद्दागुद्दी चर्चेचा विषय ठरली.

सारिका सस्ते-बोराडे या भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील मोशीतून (प्रभाग क्र.२ब) २०१७ ला प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या पतीचे चुलते रामहरी बोराडे आणि बिल्डर पटेल यांच्यात जमीन व्यवहारातून वाद आहे.

Pimpri-Chinchwad News
MP Amol Kolhe News : शिरूरला डॉ. कोल्हेंची जादू पुन्हा दिसणार का, सलग दुसऱ्यांदा खासदार होणार ?

त्यावरील सुनावणीसाठी ते पालिकेत आले होते. तेथून ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते बाहरे पडले. या वेळी नितीन बोराडेंचे चुलते आणि पटेल बिल्डरच्या मुलात आवारात वाद झाला. त्यात बिल्डरच्या मुलाने शिवीगाळ केली. ते सहन न झाल्याने ही घटना घडल्याचे नितीन यांनी सांगितले. तसेच आपला काहीही सबंध या प्रकरणाशी नसून मी मध्यस्थी करत होतो, पण आईवरून शिवी दिल्याने माझा संताप झाला, असे ते म्हणाले.

दरम्यान, ही वादावादी आणि गुद्दागुद्दी होऊन गर्दी जमताच लगेच महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षक धावले. त्यांनी दोन्ही गटांना बाहेर काढले. नंतर त्यांच्यात तडजोड झाली. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेलेच नाही. तो वैयक्तिक वाद होता. त्याच्याशी पालिकेचा संबंध नव्हता.

तसेच त्यात पालिका कर्मचारी वा अधिकाऱ्याला मारहाण झालेली नसल्याने त्याबाबत प्रशासनातर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही, असे पालिकेचे सुरक्षाप्रमुख उदय जरांडे यांनी स्पष्ट केले. मात्र, नगरसेवक पालिकेत असताना अपेक्षित असलेला हा वाद आणि हाणामारी प्रशासकीय राजवटीतही झाल्याने त्याची मोठी चर्चा झाली.

Edited by Ganesh Thombare

Pimpri-Chinchwad News
Indapur NCP News: राष्ट्रवादीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी तेजसिंह पाटील, तर कार्याध्यक्षपदी महारुद्र पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com