Baba Siddique Sarkarnama
मुंबई

Baba Siddique Shot Dead : शार्प शूटर धर्मराजच्या वकिलाचा डाव फसला; मुंबई न्यायालयाकडून गंभीर दखल

The plan of the lawyers of dharmaraj kashyap the accused in Baba Siddique murder failed: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमधील धर्मराज कश्यपबाबत त्याच्या वकिलाने न्यायालयासमोर केलेला दावा उलटला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील शार्प शूटर धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा फसला आहे. धर्मराज हा अल्पवयीन नसल्याचं 'बोन ऑसिफिकेशन' चाचपणी निष्पन्न झालं आहे. न्यायालयाने धर्मराज याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात मुंबई पोलिस स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर धगेदोरे तपासात आहेत. या हत्येत आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरमेल बलजीत सिंह (वय 23) आणि धर्मराज राजेश कश्यप (वय 21), या दोघांना अटक केलं आहे.

शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा आणि मोहम्मद झिशान अख्तर आणखी या दोघांचा हत्येत समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसंच पुण्यातील शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेत अटक केल्याची माहिती मिळते. त्यामुळे आतापर्यंतच्या तपासात, सिद्दिकी यांच्या हत्येत पाच जणांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे.

अटक केलेल्या धर्मराज कश्यप याने अल्पवयीन (वय 17) असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. परंतु आधार कार्डवर त्याचे वय 21 असल्याचे पोलिसांचे (Police) म्हणणे आहे.

त्यामुळे त्याचे निश्चित वय शोधण्यासाठी 'बोन ऑसिफिकेशन' चाचणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. धर्मराज याची चाचणी केल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

धर्मराज याची चाचपणी रात्रीच करण्यात आली. या चाचणीनुसार धर्मराज हा अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हा अहवाल रात्रीच न्यायालयासमोर ठेवला. न्यायालयाने त्याची दखल घेत त्याची देखील रवानगी पोलिस कोठडीत केली. या दोघांना न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयात रंगला युक्तिवाद

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या हत्येमागे राजकीय कारण असल्याबाबत चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. या हत्येची आरोपींकडून महिन्याभरापासून तयारी सुरू होती. तर आरोपीच्या वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय असून, यात आपल्या आशिलांना नाहक गोवण्यात आल्याचा युक्तिवाद केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT