Old Pension Scheme
Old Pension Scheme  Sarkarnama
मुंबई

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू होणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

सरकारनामा ब्यूरो

Old Pension Scheme News : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, असी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर या जुनी पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली.

मात्र, आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. कारण महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत भाष्य केलं असून आमचे सरकार शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

शिंदे म्हणाले, ''महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेबाबत अभ्यास करत आहे. याबाबत आमचं सरकार देखील सकारात्मक आहे''. त्यामुळे शिंदे यांच्या या भाष्यावरुन राज्यातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना येणाऱ्या काळात गोड बातमी मिळू शकते.

''इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के आरक्षणाबाबत राज्य सरकार हे सकारात्मक आहे. त्याचबरोबर शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेविषयी शिक्षण विभाग अभ्यास करत आहे. त्यामुळे शिक्षकांना देखील जुनी पेन्शन देण्याचा विचार आमचा आहे'', असं ते म्हणाले.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. तर नागपूरमध्ये झालेल्या एका सभेत फडणवीस म्हणाले होते, ''जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने निर्माण केला. मात्र, तो सोडवण्याची धमक आमच्यात आहे'', असं ते म्हणाले होते. तर त्यानंतर आता याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT