Old Pension Scheme News : राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीसांचे सूचक वक्तव्य

Old Pension Scheme News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये बोलत होते
Old Pension Scheme News, Devendra Fadnavis
Old Pension Scheme News, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Old Pension Scheme News : शासकीय कर्मचाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर पुन्हा एकाद जुन्या पेन्शन योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विधान परिषद निवडणुकीत हा मोठा मुद्दा केला आहे. त्या संदर्भात आज (ता. १५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे.

फडणवीस म्हणाले, 'जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केला आहे. पण तो सोडवण्याची धमक आमच्यात आहे, असे फडणवीस नागपुरातील एका सभेत म्हणाले.

Old Pension Scheme News, Devendra Fadnavis
Satyajit Tambe News : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अन् भाजपही विरोधात गेली तरी सत्यजीत तांबेंच बाजी मारणार?

नागपुरात शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, 'गेली अनेक वर्षे ही जागा शिक्षक परिषद लढवत आहे. भाजप (BJP) त्यांना समर्थन देते. यावर्षी सुद्धा आपण त्यांना समर्थन दिले आहे. नागो गाणार १२ वर्ष आमदार आहेत. त्यांच्यात काडीचाही बदल झालेला नाही. ते जमीनीवरच आहेत. काही लोक आमदार होताच त्यांचे विमान हवेत उडते, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

तसेच 'काही संस्था चालक गाणार यांच्यावर नाराज होतात. मात्र, ते कधी वैमनस्यातून त्याकडे बघत नाही. तर ते शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत राहतात. कायम विना अनुदानित शाळांचा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निर्माण केला होता. आम्ही आश्वासन दिले नव्हते. मात्र, आम्ही ते काम करून दाखवले, असे फडणवीस यांनी सांगितले.

'येत्या काळात आपण अनुदानाचे सगळे ठरलेले टप्पे पूर्ण करणार आहेत. मागील सरकारने शिक्षकांच्या बाजूने कुठलेही निर्णय घेतले नाही, असा आरोपही त्यांनी केला. आम्ही शिक्षक भरती सुरू केली आहे. काही लोकांनी अफवा उडविल्या की, पट संख्या कमी असलेल्या शाळा बंद होणार. मात्र, आम्ही शाळा बंद करणार नाही, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी दिली.

तसेच जुन्या पेन्शन योजेनवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मला लाज वाटते. ते जणू दाखवतात की जुनी योजना भाजपने बंद केली. मात्र, तसे नाही आहे. पेन्शन खर्च वाढणार असल्याने विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे असे मी सांगितले होते'. 'काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठरविले. मात्र, दिले नाही. जुन्या पेन्शनचा वाद असो की कुठलाही तो प्रश्न सोडविण्याची ताकत फक्त आपल्यात आहे, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.

Old Pension Scheme News, Devendra Fadnavis
मुंबईत ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचा मोठा डाव? चहल यांना ईडीची नोटीस अन् पेडणेकरांवर...

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे फडणवीस यांना या मुद्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच लक्ष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com