Dharavi Tense Sarkarnama
मुंबई

Dharavi Tense : धार्मिक स्थळाचा अवैध भागावरून धारावीत तणाव; BMC कर्मचाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड

Tension after BMC employees went to demolish illegal part of religious place in Dharavi : धारावीमधील मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर जमावानं हल्ला करत, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : धारावीमधील एका धार्मिक स्थळाचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. तसंच त्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची जमावानं तोडफोड केली.

जमाव आक्रमक झाल्यानं परिसरात तणाव असून, तो शांत करण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. जमावानं रस्त्यावर उतरत, जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस जमावाशी चर्च करत आहेत.

मुंबई महापालिकेचे कर्मचारी धारावीमधील एका धार्मिक स्थळाचा अवैध भाग पाडण्यासाठी आज शनिवारी सकाळी गेले होते. धार्मिक स्थळात कर्मचाऱ्यांचे पथक घुसणार, तेवढ्यात तिथं जमाव जमला आणि विरोध सुरू केला. यातून गोंधळ वाढला, वातावरण तणावाचं बनलं. पोलिसांनी (Police) जमावाला शांत करण्याचं आवाहन करत होत. परंतु जमाव ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. वातावरण तणावाचं होत असल्याने, तिथं वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले.

पोलिस आणि जमावाचा संघर्ष वाढल्यानंतर जमाव आक्रमक होत, महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यामुळे परिसरात पळापळ झाली. यात महापालिका कर्मचाऱ्यांच्या वाहनांचं मोठ नुकसान झाले. काही ठिकाणी दगडांचा वापर झाला. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना काहीसा बळाचा वापर केला. त्यानंतर संतप्त जमावानं रस्त्यावर बसून घेतलं. जमाव जोरदार घोषणाबाजी करत होता.

वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संतप्त जमाव यांच्यात चर्चा सुरू होती. जमावाच्या नेमक्या काय भावना आहेत, ते समजावून घेत, महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. याच मुद्यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी धार्मिक स्थळात जावू नये, अशी मागणी जमावाने लावून धरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT