Lalit Patil sarkarnama
मुंबई

Drug Mafia Lalit Patil: ड्रग्ज तस्करी प्रकरण; ललित पाटीलच्या भावासह साथीदार बलकवडेचा ताबा मुंबई पोलीस घेणार ?

Mumbai Police : गेल्या जवळपास १५ दिवसांपासून फरार असलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटीलला बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली.

Ganesh Thombare

Mumbai News: गेल्या जवळपास १५ दिवसांपासून फरार असलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटीलला बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर ललित पाटीलने धक्कादायक दावा करत 'मी पळून गेलो नव्हतो, तर मला पळवलं गेलं होतं, मला पळवण्यात कुणाचा हात आहे, हे सर्व मी सांगणार आहे', असं तो म्हणाला.

पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या आवारात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज आढळून आले होते. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी ललित पाटीलने रुग्णायातून धूम ठोकली होती. मुंबई पोलिसांनी ललित पाटीला अटक केल्यानंतर आता पुणे पोलीस देखील ललितचा ताबा मागणार आहेत.

ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करणार आहेत. तसेच ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेलाही मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहेत. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

या तिघांची एकत्रित चौकशी करण्यासाठी साकीनाका पोलीस गुरुवारी किंवा शुक्रवारी पुण्यातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या दोघांना ताब्यात घेण्याच्या हालचालींना सध्या वेग आला असून भूषण पाटील आणि त्याचा साथिदार बलकवडे यांचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट घेतला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात नाशिकमध्ये देखील छापेमारी केली होती. तेव्हापासून मुंबई पोलिस ललित पाटीलच्या मागावर होते. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आणखी कोण -कोण सहभागी आहे, ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत, हे समोर येणार आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT