Shocking News : मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांना हवा असलेला आणि ड्रगमाफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झाल्यावर नाशिकला आला होता. त्याला नाशिकच्या महिलेने २५ लाख रुपयांची मदत दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (Drug amnesty Lalit Patil got a fianancial assistance of 25 lacs from Nashik Women)
यासंदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी माहीती दिली. नाशिकचे पोलिसदेखील याबाबत विशेष अलर्ट आहेत. त्यांनीदेखील विविध पथके तयार करून हा तपास पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. मात्र, संवेदनशील विषय असल्याने त्यांनी फारशी माहिती दिली नाही.
ड्रगमाफिया ललित पानपाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील यांच्या विरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. आज ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चैन्नई येथून अटक केल्यानंतर नाशिक पोलिसांनी घाईघाईने आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ‘एमडी’ अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील तपासाला गती दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संशयित पाटीलचे ड्रग्ज ठिकठिकाणी पोचविण्यात सहभाग असलेल्या संशयितासह त्याच्या आर्थिक रसद पुरविण्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला ताब्यात घेतले.
या महिलेकडून ७ किलो चांदी हस्तगत केली आहे. या महिलेवर फरार ललितला २५ लाख रुपये उपलब्ध करून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. आज उपायुक्त बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी माहिती देऊन नाशिक पोलिसदेखील सक्रिय असल्याचा दावा केला.
मुंबई पोलिसांनी ‘एमडी’ ड्रग्ज बनविण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या नाशिक पोलिसांनी पाटील बंधूचे शहरातील ड्रग्ज वितरणाच्या साखळीतील संशयितांना ताब्यात घेतले.
त्यापैकी नाशिक रोडला कॅनॉल रोड भागातून विविध गुन्ह्यांतील सराईतांना एकत्र करून जागोजागी ड्रग्ज पुरविण्यात सूत्रधार असलेल्या मनोज ऊर्फ मन्ना भरत गांगुर्डे याच्यासह अर्जुन पिवाल, सनी अरुण पगारे, सुमित अरुण पगारे या चौघांना ताब्यात घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.