Sarathi Breaking News Sarkarnama
मुंबई

Sarathi Breaking News : राज्य सरकार आणि 'सारथी'च्या निष्काळजीपणाचा फटका; मराठा विद्यार्थ्यांचं 'ते' स्वप्नं भंगणार?

State Government : सारथीचा 'तो' प्रस्ताव मंत्रालयात धुळखात...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिंदे-फडणवीस सरकारने अर्थिक दुर्बल घटकातील मराठा विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरून ५० केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विधानसभेत घोषणाही केली. या शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीची जबाबदारी ‘सारथी’कडे दिली. परंतु, या सुरु शैक्षणिक वर्षासाठीची साधी जाहिरात देखील सरकारने अथवा ‘सारथी’ने काढली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

परदेशात उच्च पदव्युत्तर आणि पीएचडीसाठीचे शिक्षण घेण्यासाठी 'सारथी'(Sarathi) संस्थेमार्फत ५० पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी ३० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, २०२३-२०२४ या वर्षातील परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२२ पासून मंत्रालयात धुळखात पडल्याची बाब समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्य शासनाच्या व ‘सारथी’च्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिक्षणास जाणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षाची संधी जाण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा बोजवारा उडालेला असताना गरजू आणि पात्र मराठा(Maratha) विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्नदेखील यंदा भंगणार असल्याची भीती आहे.

'स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड'चे अध्यक्ष कुलदीप आंबेकर म्हणाले,‘सारथी’च्या संचालकांकडे याबाबत पाठपुरावा केला असता त्यांनी संबंधित प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे नोव्हेंबर २०२२ मधेच दाखल केल्याची माहिती दिली. मार्च २०२३ मध्ये सरकारला स्मरणपत्र देखील पाठविण्यात आल्याचे ‘सारथी’च्या संचालकांनी सांगितले. पण अद्यापही निर्णय रेंगाळल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, अशी माहिती 'स्टुडंट हेल्पिंग हॅण्ड'चे अध्यक्ष आंबेकर यांनी दिली.

दरम्यान, इतर मागास घटकातील अर्थात ओबीसी व एससी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची जाहिरात महिनाभरापूर्वीच निघालेली आहे. या घटकातील अर्ज प्रक्रियाही सुरु झाली आहे. ‘सारथी’च्या मार्फत शिष्यवृत्ती(Scholarship)कडे आस लावून बसलेल्या मराठा विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT