Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde सरकार राहणार की जाणार? `सर्वोच्च` सुनावणी पुन्हा लांबणीवर

Shiv sena Vs Eknath Shinde यांच्यातील सामन्याचा निकाल लागेना

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court : मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता पुन्हा लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 22 ऑगस्टला होणार आहे. आधी ती 12 ऑगस्टला होणार होती. सर्वोच्च न्यायालयात लाबंत असलेल्या सुनावणीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटामध्ये धाकधूक वाढली आहे.

या सुनावणीचा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहिल याची शक्यता आता कमी आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.

ही सुनावणी लांबणीवर का गेली यामागेचे कारण काय आहे हे स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बंडखोर 16 आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्षांनी या १६ आमदारांना नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.

तीन ऑगस्टला झालेलेल्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना (Shivsena) कोणाची यावर येऊन पोहोचली होती. यावर न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला. पक्षाच्या चिन्हाबाबत ही सुनावणी सुरू असेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असे, निर्देश सर्वोच्च न्यायालायने निवडणूक आयोगाला दिले होते.

महाराष्ट्राचे सत्तासंघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासमोर एकूण सहा याचिका आहे. सर्व सहा याचिका एकत्रित करून घटनापीठाकडे देण्यास कोणीही विरोध दर्शविलेला नाही. त्यामुळे सर्व सहा याचिका एकत्रितपणे घटनापीठाकडे सोपवल्या जातील, अशी शक्यताही आता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT