Eknath Shinde सरकारचा पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; पूर नुकसानीची मदत दुप्पट

Eknath Shinde : आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे सरकाराचा बहुचर्चीत मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. त्यामध्ये १८ मंत्र्यांनी शपत घेतली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे सरकारची आज पहिलीच बैठक झाली. सर्व मंत्री या बैठकीला हजर होते. 15 लाख हेक्टरपर्यंत नुकसान या अतिवृष्टीत झाल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई, देण्यात येणार आहे. जून आणि जुलैमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने मोठा दिलासा आहे. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार आहे. तसेच मदतीसाठी दोन हेक्टरची मर्यादा होती. ती आता तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे.

Eknath Shinde Latest News
महाविकास आघाडीतही नाराजीनाट्य; शिवसेनेने 'तो' निर्णय परस्पर घेतला... काँग्रेसचा आरोप

याच बरोबर कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मेट्रोला वाढिव निधी देण्यात आला आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात काम बंद असल्यासारखेच होते, असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर साधला.

Eknath Shinde Latest News
शिंदे गटाचे 22 आमदार शपथविधीला अनुपस्थित... `मातोश्री`चे आहे लक्ष!

मेट्रोचा प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण करायचा होता. मात्र, अडिच वर्षांत काम न झाल्यामुळे त्याचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर साधारण, १३ लाख लोक मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यामुळे मुंबई करांसाठी मोठा दिलासा या प्रकल्पामुळे मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com