Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest News
Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest News Sarkarnama
मुंबई

राज्यात खरी सत्ता भाजपचीच; शिंदे गटाला मिळाली फक्त 20 टक्के निधीची खाते

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघीडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नव्हता. त्यांच्यावर अन्याय होत होता,असा आरोप करत ४० शिवसेना आमदारांनी बंड करत ते शिंदे गटात गेले होते. यानंतर बंडखोर आमदार आणि भाजपच्या साथीने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र मंत्रीमंडळ विस्तार कमालीचा लांबला होता. तो अखेर झाला आणि त्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ खातेवाटपह झाला आहे. मात्र खातेवाटप बघता राज्यात खरी सत्ता भाजपचीच असून शिंदे गटा फक्त नावालाच आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Eknath Shinde-Devendra Fadnavis Latest News)

काल झालेल्या या खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांपेक्षा अधिक महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिसत असल्याने याची चर्चा होत असून भाजपाकडे गेलेली खाती बघता राज्यात खरी सत्ता भाजपाचीच असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये निधी वाटपातले प्रमाण पाहता भाजपाकडे 80 टक्के तर 20 टक्के शिंदे गटाकडे, अशी विभागणी झाली आहे. यामुळे खरी सत्ता भाजपची शिंदे गट फक्त नावाला, अशी चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आणि शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने नवं सरकार स्थापन केलं. मात्र या नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ३९ लांबला होता. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ असे एकूण १८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, खातेवाटपही लांबणीवर पडला होता. तो अखेर काल झाला. मात्र यामध्ये महत्वाचे खाते हे भाजपकडे गेल्याचे दिसत आहे. यामध्ये सत्तेतला 80 टक्के वाटा हा भाजपाने स्वत:कडे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी आठ खाती आहेत. तर भाजपचे इतर मंत्रीही महत्वाची खाते देण्यात आले आहेत.

भाजपच्या मंत्र्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास, गिरीष महाजन- ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण, रविंद्र चव्हाण -सार्वजनिक, अन्न व नागरी पुरवठा, मंगलप्रभात लोढा - पर्यटन, महिला व बालविकास, सुधीर मुनगंटीवार - वन, चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, सुरेश खाडे - कामगार तर अतुल सावे यांच्याकडे सहकार,अशी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.

महत्वाची आणि जास्त निधीची खाती जशी महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे होती अगदी तसाच फॅार्म्युला नव्या सरकारमध्ये भाजपने वापरला आहे. ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत होती तेव्हा भाजपकडून शिवसेनेवर निधी वाटपाबाबत कसा अन्याय होतो. हे आकडेवारी सांगत टीका केली होती. मात्र आता नव्या सरकारमध्ये भाजपने महत्वाची खाते आपल्याकडे ठेवलेले दिसत आहे.

शिंदे गटाला दिलेल्या खात्यामध्ये गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे -बंदर व खनिकर्म, संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन, संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन,अशी दुय्यम खाती देण्यात आली आहेत. त्यामध्ये शिंदेगटाकडे उदय सामंत यांना उद्योग, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य, अब्दुल सत्तार यांना कृषी तर दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण अशी खाती आहेत. यामध्ये मंत्र्यांचा प्रभाव दाखवतील अशी दोन-तीन खाती शिंदेगटाकडे आहेत. मात्र मंत्री खूश नसल्याची चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT