Congress Second candidate list Sarkarnama
मुंबई

Congress Second candidate list : अखेर काँग्रेसचं ठरलं! दुसऱ्या यादीत 'या' उमेदवारांना संधी

Second list of 23 Congress candidates announced : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांनंतर काँग्रेसने शनिवारी (ता.26) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतून 23 उमेदवारांची समावेश आहे. तर काँग्रेसच्या पहिल्या यादीत 48 जणांची उमेदवारी जाहीर केली होती.

Jagdish Patil

Second list of 23 Congress candidates announced : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चांनंतर काँग्रेसने (Congress) शनिवारी (ता.26) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

या यादीतून 23 उमेदवारांची समावेश आहे. तर काँग्रेसने पहिल्या यादीत 48 जणांची उमेदवारी जाहीर केली होती. काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जागावाटपाबाबतची एक महत्वाची बैठक पार पडली होती.

यानंतर काही जागांवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. अशातच आता काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरल्याची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

त्याप्रमाणे आता उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. तर आघाडीत घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 तर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीने आतापर्यंत 45 उमेदवार जाहीर केले आहेत.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार -

भुसावळ - राजेश मानवतकर

जळगाव - स्वाती वाकेकर

अकोट - महेश गणगणे

वर्धा - शेखऱ शेंडे

सावनेर - अनुजा केदार

नागपूर दक्षिण - गिरिश पांडव

कामठी - सुरेश भोयर

भंडारा - पूजा ठवकर

अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड

आमगाव - राजकुमार पुरम

राळेगाव - वसंत पुरके

यवतमाळ - अनिल मांगुलकर

आर्णी - जितेंद्र मोघे

उमरखेड - साहेबराव कांबळे

जालना - कैलास गोरंट्याल

औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख

वसई : विजय पाटील

कांदिवली पूर्व - काळू बधेलिया

चारकोप - यशवंत सिंग

सायन कोळिवाडा : गणेश यादव

श्रीरामपूर : हेमंत ओगले

निलंगा : अभय कुमार साळुंखे

शिरोळ : गणपतराव पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT