Sangamner News : थोरात-विखेंमधील वाद पेटला! संतप्त कार्यकर्त्यांकडून गाड्यांची तोडफोड, नेमकं प्रकरण काय?

Sujay Vikhe Patil And Jayashree Thorat : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेरमधील काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
Jayashree Thorat and Sujay Vikhe
Jayashree Thorat and Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Sangamner News, 26 Oct : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेरमधील काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

या घटनेनंतर भाजप (BJP) आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. तर शहरात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशीरा जयश्री थोरात यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं.

आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जवळपास 7 तास हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान, या प्रकरणी फिर्यादी नोंदवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Jayashree Thorat and Sujay Vikhe
Shivsena News : माजी खासदार सहा महिन्यातच बदलणार पुन्हा पक्ष; पालघर विधानसभेसाठी कोणाला मिळणार संधी ?

नेमका वाद काय?

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांची सभा झाली. या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. या सभेत भाषण करताना वसंतराव देशमुख म्हणाले, "आपल्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणतात. पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहेत."

वादग्रस्त वक्तव्य करणारे वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ करत गाड्यांची तोडफोड केली आहे. शिवाय सभास्थळी ठिय्या मांडत काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांकडून देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

Jayashree Thorat and Sujay Vikhe
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी उमेदवार यादी जाहीर

सुजय विखेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, या घटनेवर सुजय विखे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला. ते म्हणाले, "मी त्यांना ताई म्हणून संबोधलं, त्यामुळे महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. मात्र ज्यांनी आमच्या गाड्या जाळल्या त्यांच्यावरही कारवाई करा.तसेच आमच्याबद्दल चुकीच वक्तव्य केलं, तर आम्ही देखील गप्प बसणार नाही." असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com