Thane Lok Sabha Constituency sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 Voting : ठाण्यातील गद्दारांचा बोगसपणा थांबेना, बँकेतील एटीएममधून पैसे वाटल्याचा दावा...

Pradeep Pendhare

Thane News : ठाणे लोकसभा मतदारसंघात चुरशी लढतीसाठी आज मतदान झाले. बोगस मतदानापाठोपाठ आता मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एका एटीएममधून पैसे वाटप झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटाकडून करण्यात आला. तसा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

शरद पवार Sharad Pawar पक्षाचे कार्यकर्त्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे वाटप झाल्याचा दावा केला. हा व्हिडिओ कार्यकर्त्याने शेअर केला आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममधून पैसे वाटप होत आहे, असे तो व्हिडिओत म्हणत आहे. यावर काही जण बँकेतून उठून बाहेर येत असून, पैसे वाटप काही होत नाही, असे म्हणताय. यावर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पैसे वाटप... पैसे वाटप.., असे म्हणून व्हिडिओ काढत आहे. यावर एक महिला म्हणते, पैसे वाटपाना कोठे दिसते आहे का? व्हिडिओ काढून कायपण टाकता. उन्हामुळे आम्ही आतमध्ये बसलो होते. आम्ही वडापाव खात आहे. पैसे दाखवा. या महिलेबरोबर इतर लोक देखील म्हणत आहे की, पैसे दाखवा. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैसे वाटपाचा दावा करणाऱ्या व्हिडिओ ज्याने काढला, त्या कार्यकर्त्याने त्यावर प्रतिक्रियेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो आहे की, मुंब्रामध्ये गद्दार गटाचा पराभव दिसत आहे. श्रीकांत शिंदेचे Shrikant Shinde कार्यकर्ते मुंब्रामधील गद्दार नगरसेवक मोरेश्वर किणी आणि त्यांच्या पत्नी तृप्ती किणी, या सम्राटनगरच्या नाक्यावरील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये पैसे वाटप करताना स्वतः पाहिले आहे. स्वतः व्हिडिओ बनवला आहे. गद्दारांना पराभव दिसू लागल्याने पैसे वाटप करून मत विकत घेण्याची वेळ आली आहे. राज्यातील जनता या गद्दारांना जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. तसेच या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याने म्हटले आहे. Distribution of money to voters in Thane Constituency in Lok Sabha elections

दरम्यान, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार खासदार राजन विचारे rajan vichare यांनी देखील ठाण्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळी बोगस मतदान झाल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. मूळ मतदारांचे दुसऱ्यानेच मतदान केले आहे. गद्दारांचा पराभव दिसत असल्याने बोगस मतदानासाठी बाहेरून दीड हजारांवर लोक आणली असल्याची माहिती आपल्याकडे आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे आपण लक्ष वेधणार असल्याचे राजन विचारे यांनी म्हटले होते. ठाण्यातील बोगस मतदानाच्या प्रकारानंतर आता मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याने शेअर केल्याने निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यात प्रशासन कमी पडल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT