Sharad Pawar News : शिवसेनेसोबत 2014 ला सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : फडणवीसांचे यांचे दावे शरद पवारा यांनी फेटाळून लावले. माझा मोदी व भाजपबरोबर सत्ता सहभागासाठी विरोध होता, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचे सरकार 2019 मध्ये राज्यात सत्तेत आले होते. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाल्याने भाजपला विरोधीपक्षात बसावे लागले. शिवसेना फोडून भाजप BJP पु्न्हा सत्तेत आला. मात्र, 2019 च्या आधीच 2014 मध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होते, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Raosaheb Danve News : मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार? रावसाहेब दानवे म्हणाले, 'जनता पाठिंबा...'

'शिवसेना Shivsena राष्ट्रवादी, काँग्रेसचा महाविकास आघाडीचा प्रयोग 2019 मध्ये झाला. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष सत्तेत होते. पण हा प्रयोग 2014 मध्येच करण्याचा प्रयत्न आणि नियोजन होते. पण ते यशस्वी झाले नाही' , असे शरद पवार Sharad Pawar यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले. 2014 ला भाजपला बाहेरून पाठींबा देणे ज्याच्यामुळे शिवेसना भाजपपासून लांब जाईल हा देखील याच रणनीतीचा भाग होता, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

2014 मध्ये निकालानंतर भाजपने न मागता मी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यामागे शिवसेनेला भाजपबरोबर जाण्यापासून रोखायचे होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर जाण्याचा तेव्हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांना भाजप अधिक जवळचा वाटला. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग तेव्हा फसला, असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीसांचा दावा सत्य नाही

देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी भाजपसोबत चर्चा करत होती. शिवसेनेला सत्तेत घेण्यास विरोध होता मात्र पंतप्रधान मोदींना भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या तीन पक्षांचे सरकार हवे होते, असा दावा केला होता. तसेच 2014, 2017, 2019 मध्ये भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांना पुढे करत आणि स्वतःही चर्चा करून शरद पवारांनी माघार घेतली असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांचे यांचे हे दावे शरद पवारा यांनी फेटाळून लावले. माझा मोदी व भाजपबरोबर सत्ता सहभागासाठी विरोध होता, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
BJP Political Analysis : उत्तर महाराष्ट्रातील वर्चस्व राखण्यासाठी भाजपचा यंदा प्रखर संघर्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com