Rajan Vichare News: शिंदेंची टीका झोंबली; राजन विचारे भडकले, म्हणाले, ' मला तोंड उघडायला लावू नका...'

Thane Loksabha Election 2024 : ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची काय अवस्था झाली, किती आमदार होते. तुम्ही फक्त सेटिंग करत राहिलात, याला फोड,त्याला फोड करत राहिलात.
Rajan Vichare News
Rajan Vichare NewsSarkarnama

Thane News : शिवसेनेतील बंडानंतर ठाण्यात आनंद दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये फूट पडली. खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहिले.त्यांना आता ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक नरेश म्हस्के उभे आहेत.

याचदरम्यान, शिंदेंनी राजन विचारे हे आनंद दिघे यांचे नकली शिष्य, तर नरेश म्हस्के असली शिष्य आहेत अशी टीकेची झोड उठवली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांबरोबर राजन विचारे गेले आहेत. आनंद दिघे यांना उद्धव ठाकरे यांनी कायम त्रास दिला,असा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.यावर आता राजन विचारे चांगलेच भडकले असून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना कडक इशारा देतानाच मला तोंड उघडायला लावू नका असं म्हटलं आहे.

Rajan Vichare News
Arvind Kejriwal News : नायब राज्यपालांचा केजरीवालांवर बॉम्ब; ईडी, सीबीआयनंतर आता 'टेरर फंडिंग'बाबत NIA चौकशीचा ससेमिरा

खासदार राजन विचारे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.ते म्हणाले,धर्मवीर (Dharmaveer ) हा चित्रपट कार्यकर्त्यांमुळे चालला.मी स्वत:या चित्रपटाचे कित्येक शो घेतले होते.तुम्ही थोडे चित्रपटासाठी पैसे खर्च केले. ठाणे महानगरपालिका तुमच्याकडे होती. तिथे काय धंदे केले हे लोकांना माहिती आहे.

नरेश म्हस्के आणि तुमची लोकं तिथं भ्रष्टाचार करत होती. कसे टेंडर सेटिंग करायचे,गोल्डन गँग वगैरे कुणाला म्हटलं जायचं.आज ठाणे महानगरपालिकेची काय वाट लावून ठेवली असा हल्लाबोलही विचारे यांनी यावेळी केला.जनतेचा कर रुपी आलेला पैसा विकासकामांसाठी आला आहे की त्यांचे पोटं भरण्यासाठी असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

राजन विचारे म्हणाले, आम्ही बोलत नाहीत , अजूनही बोललेलो नाही.उगीच मला तोंड उघडायला लावू नका .तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारेने पाहिलेले आहेत.आणि पक्षाशी प्रामाणिक आहे. तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही.ज्यावेळी एकनाथ शिंदेंना कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालला होता. त्यावेळी समजावण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो होतो.त्याचा याच शिवाजी मैदानावर पक्षप्रवेश होणार होता.त्यावेळी मीच नरेश म्हस्केला मीच मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेलो होतो असा गौप्यस्फोटही विचारेंनी यावेळी केला.

शिंदेंबाबत खळबळजनक दावा...

ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत खळबळजनक दावा केला होता.ते म्हणाले, आणि तुम्ही काय पक्षाच्या गोष्टी करता.2013 ला आमदार असताना तुमच्यासह आमदार घेऊन तुम्ही काँग्रेसमध्ये चालला होता.तुम्ही कुठल्या पक्षाशी प्रामाणिक राहिला आहात का अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेची काय अवस्था झाली, किती आमदार होते. तुम्ही फक्त सेटिंग करत राहिलात, याला फोड,त्याला फोड करत राहिलात.कुठल्या पक्षाची लोकं फोडायची सोडली त्यांनी. मनसे, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सगळ्या पक्षांची लोकं फोडल्याचा आरोपही त्यांनी शिंदेंवर केला.

याचवेळी राजन विचारे म्हणाले, शिंदेंची दोन मुले गेली ज्यावेळी गेली, तेव्हा त्यांची बॉडी आणायला मीच तिथे होतो. त्यांना आमदारकीचं तिकीट माझ्यामुळे मिळाले.अगदी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर झालेल्या शिवसेनेतील त्यांच्या बंडापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो असेही विचारे यांनी यावेळी सांगितले.

तसेच तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. त्यावेळी तुम्ही ठाण्यासाठी काय केलं ते सांगा, एकटा एकनाथ शिंदे काही करु शकत नाही. हा राजन विचारे तुमच्यासोबत होता हे विसरु नका असेही ते यावेळी म्हणाले.

Rajan Vichare News
Dindori Constituency 2024 : शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी; माकपचे गावित यांनी घेतली माघार

हीच आनंद दिघे यांना खरी श्रद्धांजली असेल...!

दिवंगत आनंद दिघे यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले पाहीजेल असे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना उबाठा गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केले आहे. यावेळी मी दिघे यांच्या खऱ्या शिष्यसोबत बसलो आहे. असेही म्हटले.

याचदरम्यान उमेदवार राजन विचारे यांनी दिघेसाहेब जाऊन 22 वर्षे झाले. आता तुम्हाला कंठ फुटला आहे. त्यामुळे तुमचा लवकर पोपट होईल अशी टीका शिंदे सेनेवर बोलताना केली. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Rajan Vichare News
Nashik Constituency : ...अन् शेवटच्या क्षणी भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी करायला लावली धावाधाव!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com