Aaditya Thackeray Latest News, Eknath Shinde Latest News Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर पुन्हा डागली तोफ ; म्हणाले,'' मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज...''

Jalna Maratha Protest : '' खोके सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर...''

Deepak Kulkarni

Jalna : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन सत्ताधारी - विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जालन्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शांततेत सर्व सुरु होतं, मग एवढा लाठीचार्ज करण्याची गरज होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच इतकी संवेदनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊच शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही असा आरोप करत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde) वर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीच्या मान्सून महोत्सवाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी जालन्यातील घटनेवरुन सरकारवर सडकून टीका केली.ते म्हणाले, मी दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जवळून पाहिलं आहे. इतकी संवदेनशील घटना घडते आणि त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना कल्पना नाही असं होऊ शकत नाही. त्यांना माहिती नसल्याशिवाय पोलीस लाठीचार्ज करणार नाही. त्यामुळे या खोके सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर सरकार राजीनामा देईल असेही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले...?

शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना नेते आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray)नी शिंदे - फडणवीस - पवार सरकारचा जालन्यातील लाठीचार्जवरुन धारेवर धरले. ते म्हणाले, जो लाठीचार्ज झाला आहे तो अत्यंत भयानक आहे. असं कोणी शत्रूसोबत देखील वागत नाही. तर यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

ठाकरे म्हणाले, हे सरकार नक्की महाराष्ट्राचंच आहे? हाच प्रश्न सध्या पडतोय. ही लोकं महाराष्ट्राशी गद्दारी करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी करायची गरज काय. शासन नक्की काम कुणासाठी करतंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी जालन्यातील घटनेवरुन राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र अजूनही आंदोलकांकडे फिरकलेले नाहीत. पण तुम्ही आंदोलकांवर चालवलेल्या प्रत्येक काठीचा हिशेब ठेवला जाईल असा इशारा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

त्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल.

दानवे म्हणाले, राज्यातील खोके सरकारने बारसूच्या आंदोलकांवर, आळंदीतील वारकऱ्यांवर आणि आता मराठा समाजाच्या आंदोलकांवर ज्या लाठ्या-काठ्या चालवल्या, त्या एक एक काठीचा हिशेब ठेवला जाईल. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता या सगळ्याची व्याजासकट परतफेड मतपेटीतून केल्याशिवाय राहणार नाही असे दानवे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT