chandrashekhar Bawankule, Devendra Fadanvis sarkarnama
मुंबई

BJP : भाजपमध्ये लॉबिंग होतच नाही; आमचा फडणवीसांवर विश्वास... बावनकुळे

बावनकुळे Chandrashekhar Bawankule म्हणाले, आमच्यात कोणीही आमदार MLA नाराजी नाहीत. उलट जनता अपेक्षेने नव्या सरकारकडे News Government पहात आहे.

Umesh Bambare-Patil

मुंबई : आमच्या पक्षात कोणतेही लॉबिंग होत नाही. तशी कोणालाही सवयी नाही. आमच्या सर्वांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास असून कोणाला कोणते खाते द्यायचे, कोणाची किती क्षमता आहे, याचा त्यांना संपूर्ण अभ्यास आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात, असे स्पष्ट मत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.

मंत्रीमंडळ स्थापन झाले तरी खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही, नेमके काय कारण असावे, असे विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमच्यात कोणीही आमदार नाराजी नाहीत. उलट जनता अपेक्षेने नव्या सरकारकडे पहात आहे. चांगले सरकार सत्तेत आले असून चांगले निर्णय घ्यायला काही काळ लागणार आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये खाते वाटपाबाबत लॉबिंग होतय का, या प्रश्नावर ते म्हणाले, बिलकुल नाही, आमच्यात लॉबिंग होत नाही. मुळात लॉबिंग करायची आमच्या नेत्यांना सवयी नाही. आमचे जेवढे नेते आहेत ते आमदार आहेत. कोणत्याही विषयासाठी नेत्यांना भेटत नाही. तशी कोणी हिंमतही करत नाही. सर्वांचा विश्वास आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे.

ते योग्य निर्णय करत असतात. कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री, कोणाला कोणते खाते द्यायचे, कोणाची किती क्षमता आहे, याची त्यांना महिती असून संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात. प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुमचे नाव पहिले चर्चेत आहे, याविषयी श्री. बावनकुळे म्हणाले, हा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे याबाबत निर्णय घेतात. त्यांचा याबाबतचा अजून निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT