Bacchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu On Political Crisis: अजितदादांना सरकारमध्ये घेतल्याने बच्चू कडू नाराज? म्हणाले, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं..

NCP Political Crisis News: या सर्व घाडामोडी सुरू असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावरही दावा केला. यानंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा मुंबईत मेळावा पार पडला. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना सुनावलं.

या सर्व घाडामोडी सुरू असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेतील काही नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदे गटाचे समर्थक आणि आमदार बच्चू कडू यांनी नेत्यांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत असताना आम्हाला (शिंदे गट) विचारात व विश्वासात घ्यायला हवं होतं, असं मत बच्चू कडू यांनी माडलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत बरोबर घेत असताना याबाबतची चर्चा, मंथन व्हायला पाहिजे होतं. मात्र, यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची गोची झाली आहे. आम्हाला विश्वासात न घेता राष्ट्रवादीला बरोबर घेतलं", असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

"महाविकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीचा त्रास होत होता. काम मार्गी लागत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. पण आता त्या आरोपाला छेद लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे", असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

"पण ज्यांनी हा उठाव केला, त्यांनीच आपल्या डोक्यावर कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण, असं होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आहे", असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT