Monsoon Assembly Session :  Sarkarnama
मुंबई

Monsoon Assembly Session : विधिमंडळात आज 'या' विषयांवरून होणार घमासान; विरोधकांची रणनीती काय?

Maharashtra Pavsali Adhiveshan : "मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या महिला आमदारांनी सभात्याग केला होता."

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिनेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी सभागृहात किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण, अमली पदार्थांचा मुद्दा, विकास निधी, शेतीचे प्रश्न इत्यादी मुद्दे उपस्थित केले, तर काही प्रश्नांवर जोरदार घमासान ही घडून आले. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या महिला आमदारांनी सभात्याग केला होता. आज सभागृहात विरोधकांनी काही प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची रणनिती आखली आहे. (Latest Marathi News)

आजचे विधानसभेतील महत्त्वाचे कामकाज :

समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी विदर्भ ट्रॅव्हल्स अपघात झाला आणि त्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला याप्रकरणी अद्याप चौकशी समिती नेमण्यात न आल्याने आज यावर विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतील. समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या आपघातांबाबत विरोधक प्रश्नांचा भडिमार करणार आहेत.

तसेच, राज्यभरात टोमॅटो पीकाचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना नाशिक जिल्ह्यातील तब्बल २०० टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेली मोठी फसवणूक झाली आहे. यामुळे हाही प्रश्न अधिक त्वेषाने पुढे येण्याची शक्यता आहे.

विधानपरिषेदेतील कामकाज :

विधानसभाप्रमाणेच विधानपरिषदेतही, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी काही दिवसापूर्वी राज्य सरकारला पत्र लिहीत शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यात प्रचंड प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. नुकतंच शिक्षण विभागातील एका बड्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 23 शिक्षणाधिकारी यांच्या विभागीय चौकशीची मागणी आज विरोधी पक्षाकडून लावून धरण्यात येणार आहे.

तसेच, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी तेराशे कोटी रुपये खर्च करून ही सौंदर्यकरण पूर्ण झालेलं नाही. या व्यतिरिक्त आणखी एक हजार कोटी देखील विविध कामांसाठी मिठी नदीसाठी खर्च करण्यात आले आहेत. परंतु नदीच्या पुनर्जिवितेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या विषयावरून सत्ताधारी पक्षाकडून मागील काळात मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT