Manipur News: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरून सर्वत्र टीकेचा सूर असतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र धक्कादायक विधान केल्याचे दिसून आले आहे. "एकाच प्रकारचे 100 एफआयआर झाले असून अशा प्रकारचे अनेक गुन्हे मणिपूरमध्ये घडलेत, असे सांगून मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. अधीच अत्याचाराच्या घटनेने कोंडीत सापडलेले मणिपूर सरकारपुढे मुख्यमंत्री बीरेन यांनीच खड्डा खोदून ठेवला आहे.
मणिपूरात दोन महिलांना विवस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आल्याची दुर्देवी घटना समोर आली. या घटनेचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उमटले. याबाबत पंतप्रधानांनी देखील भाष्य करत कारवाई करण्याचे आश्वासन देत या घटनेबाबत कोणाचीही गय करणार नाही, असं सांगितलं. तर याच मुद्यावरून विरोधकांनी संसदेत गोंधळ करत आक्रमक पवित्रा घेतला.
या घटनेबाबत देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच आता खुद्द मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांच्या विधानामुळेच मणिपूर सरकार कोंडीत सापडले आहे. मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना "या घटनेच्या व्हिडिओबद्दल बुधवारी समजलं. पण अशा प्रकारचे 100 एफआयआर झाले असून त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. जे झालं ते चुकीचं आहे", असं त्यांनी म्हटलं.
या अत्याचाराच्या घटनेनंतर मणिपूर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आले आहे. आता पुढील आणखी कठोर कारवाई होईल, असं मुख्यमंत्री बीरेन यांनी सांगितलं.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.