Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : मदतीसाठी येतात, पण मतदानाला का येत नाहीत ? ; राज ठाकरेंचा रोखठोक सवाल

MNS News : त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल तर माझ्याकडे कशाला येता?

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या खास शैलीत मतदारांना टोला लगावला.

मनसेच्या (MNS) रस्ते, साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापनदिन आज (रविवारी) प्रभादेवी (मुंबई) येथे साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे बोलत होते. राज्य सरकारकडे आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी यंत्रणा नसल्याचं सांगत राज ठाकरे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पडलेल्या पावसावर राज ठाकरे म्हणाले, "जगभरात आपातकालीन घटना घडल्यावर त्यांच्याकडे चांगल्या यंत्रणा असतात. काही दिवसांपूर्वी मी शारजाचा एक फोटो पाहिला. पावसाने मैदान भिजले तेव्हा मैदानावर इतर यंत्रणा होत्याच, पण हेलिकॉप्टरनेही मैदान सुकवण्यात आले आणि आपल्याकडे अहमदाबादमध्ये हेअर ड्रायरने मैदानातील एवढं बारीक गवत सुकवत होते.ही आपल्याकडची आपातकालीन यंत्रणा,"

नाशिकमधील शेतकऱ्यांच्या बाबतचा एक किस्सा त्यांनी या कार्यक्रमात सांगितला. ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी नाशिकमधील शेतकरी माझ्याकडे आले होते. अनेक प्रश्न सांगत होते. त्यांना मी आमदार, खासदार कोणत्या पक्षाचा, जिल्हा परिषद कोणाच्या हातात आहे, अशी विचारणा केली आणि पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल तर माझ्याकडे कशाला येता? असा प्रश्न त्यांना विचारला."

"मदतीसाठी येतात, आमच्या कामाचं कौतुक करातात, मतदानाला का येत नाही," असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. "पावसाळा सुरु होत आहे, त्यासाठी प्रशासनाने सर्तक राहणे गरजेचे आहे. मुळात नाले कुणामुळे तुंबतात, हे पाहणे गरजेचे आहे. पुरेशी आपतकालीन व्यवस्था नसल्याने मुंबईतील चार नद्या मारुन टाकल्या आहेत," असे राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT