Appasaheb Dharmadhikari Sarkarnama
मुंबई

Appasaheb Dharmadhikari's Reaction: घटना माझ्यासाठी क्लेषदायक; आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Bhushan Award Heatstroke Incident: राज्य सरकार करणार रुग्णांच्या उपचाराचा खर्च

सरकारनामा ब्युरो

Kharghar Incident News: ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (दि. १६) महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडला.

या कार्यक्रमासाठी लाखो लोक उपस्थित होते. यामध्ये अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन भर दुपारी केले होते. उन्हामुळे अनेक जणांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यामध्ये एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना क्लेषदायक असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी म्हटले आहे. धर्माधिकारी म्हणाले, "श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरलेला आहे. खारघर (Kharghar) येथील कार्यक्रमासाठी उपस्थित सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहे. कार्यक्रमात काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रात झाला. त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे."

यानंतर आपदग्रस्तांसोबत कायम राहणार असल्याची भावनाही व्यक्त केली. धर्माधिकारी म्हणाले, "माझे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. या घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे."

दरम्यान, घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'एमजीएम' रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच उपचार घेणाऱ्या नागरिकांना चांगल्यात चांगले उपचार मिळतील याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या. सर्व रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेचा उपयुक्त दर्जाचा अधिकारी समन्वय करेल. नातेवाईक आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबत सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT