Devendra Fadnavis News : Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : कोविड घोटाळ्याशी ज्यांचं कनेक्शन, त्यांच्याकडे छापेमारी सुरू असेल; ईडीच्या कारवाईवर फडणवीसांचं सूचक...

Devendra Fadnavis News : ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई;

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi News) सरकार असताना कोव्हीड काळामध्ये लाईफलाईन कंपनीचा कथित घोटाळा केला गेला असा आरोप केला जात आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते, असा आरोप केला होता. (Latest Marathi News)

याच आरोपांची चौकशीसाठी ईडीकडून जवळपास १५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच,सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये आता ईडीकडून सकाळीच छापेमारी करण्यात आली आहे.सुजीत पाटकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात, ठाकरेंच्या निकटवर्तींयावर सुरू असलेल्या छापेमारीवर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सुरू असलेल्या ईडीच्या छापेमारीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नेमकी काय कारवाई चालली आहे. याबद्दल मला काही कल्पना नाही. परंतु एवढं निश्चितपणे सांगतो. ज्या वेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर कोव्हीड सेंटरचा घोटाळा बाहेर आला. त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती."

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या कंत्राट देण्यात आले. कोव्हीड काळात लोकांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. अनेक मृत्यू झाले, यासंदर्भातली चौकशी चालली होती. त्यामुळे आता ही चौकशी कुठपर्यंत आली आहे, या छाप्यांमध्ये काय मिळालं आहे, हे ईडीच सांगू शकेल, मला त्याची कल्पना नाही. मात्र ज्या ज्या लोकांचं याच्याशी कनेक्शन असेल, त्यांच्याकडेच ही छापेमारी सुरू असेल. या संदर्भात अधिकृत माहिती ईडी देवू शकेल. माझ्याकडे याची माहिती नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT