Shambhuraj Desai News : मंत्री शंभूराज देसाईच उतरले रस्त्यावर; पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News : पुण्यातून ८५ लाखांची बनावट दारू केली जप्त
Shambhuraj Desai with Officers
Shambhuraj Desai with OfficersSarkarnama
Published on
Updated on

Excise Department Of Maharashtra : गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरमधून तब्बल ८५ लाख रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई करताना अधिकाऱ्यांसह स्वतः राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई उपस्थित होते. हा थरार मंगळवारी (ता. २०) रात्री उशीरा घडला. पुण्यातील खेड शिवापूर टोल नाका परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. (Latest Marathi News)

अधिक माहितीनुसार, एका कंटेनरमधून गोव्याहून बनावट दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळालेली होती. त्यानुसार संबंधित कंटेनरचा अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. खेड शिवापूर टोल नाका पास करून पुढे आल्यानंतर कंटेनरला अधिकाऱ्यांनी थांबवले. त्यावेळी कंटेनरमध्ये ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट असल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी कंटेनरची तपसणी केली. त्यावेळी त्यात विविध कंपन्यांचे लेबल असलेल्या दारुच्या बाटल्यांचे बॉक्स आणि पोती आढळून आली.

Shambhuraj Desai with Officers
Shivendraraje Vs Udayanraje Bhosale Dispute: विरोध डावलून शिवेंद्रराजेंनी नारळ फोडला; उदयनराजे सातारकरांपुढे उघडे पडले

कंटेनरमधून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८५ लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बनावट दारू विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्याचा लवकरच बिमोड करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांसोबत स्वतः रस्त्यावर उतरत ही कारवाई केली आहे. कारवाई केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. पी. रजपूत आणि कर्मचाऱ्यांचे देसाई यांनी अभिनंदन केले.

Shambhuraj Desai with Officers
Third front in Maharashtra : महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार? 14 राजकीय पक्षांनी केली चाचपणी !

दरम्यान, ही कारवाई राज्य उत्पादन मंत्री शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपायुक्त मोहन वर्ट्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सी. पी. राजपूत, निरीक्षक सुपे, प्रवीण शेलार, दीपक उपनिरीक्षक प्रदीप मोहिते, एस. के. काणेकर, विजय सुपे, अक्षय चौधरी, राम मेहेत्रे, भागवत राठोड, संदीप सुर्वे, सुनील कुदळे, तात्या पोलावरे, रणजित शिंदे, दत्ता चव्हाण, समीर पडवळ, संदीप मांडवेकर, रामेश्वर चावरे यांनी सहभाग घेतला होता.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com