Mukesh Ambani  Sarkarnama
मुंबई

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

Mumbai News : अंबानींच्या ई मेल आयडीवर धमकी देण्यात आली आहे.

Mangesh Mahale

Mumbai: प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी धमकी देणाऱ्या व्यक्तीने केली आहे. जर पैसे दिले नाही, तर अंबानींना जिवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली आहे. अंबानींच्या ई मेल आयडीवर धमकीचा ई मेल पाठवला आहे.

27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ई मेल आयडीवर धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत”, असे या ई मेलमध्ये लिहिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा ई मेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा यंत्रणेने गावदेवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपास करीत आहेत. गेल्या वर्षीही मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबीयांच्या संदर्भात धमकी दिलेली होती.

याआधीही अंबानी कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. भौमिक नावाच्या या मनोरुग्णाने रिलायन्स फाउंडेशन हाॅस्पिटलमध्ये फोन करून अंबानी कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या मानसिक रुग्णाने 7 ते 8 वेळा फोन केले होते. दरम्यान, या धमकीनंतर रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलकडून डी. बी. मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होती. पोलिसांनी तातडीने सूत्रं फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT