Torres Scam Sarkarnama
मुंबई

Torres Investment Scam: मुंबईकरांना कोट्यवधींना गंडवणाऱ्या 'टोरेस' वरील छाप्यानंतर पोलिस आयुक्तांनी दिला मोठा आदेश

Torres Scam Mumbai Updates : टोरेस कंपनीच्या गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास योग्य दिशेने केला नाही, पोलिसांच्या या कामकाजाबाबत फणसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: टोरेस घोटाळ्यामध्ये मुंबईमधल्या अनेक नागरिकांचे पैसे बुडाले आहेत. 21 दिवसांमध्ये पैसे डबल होतील, असे आमिष 'हेरा फेरी'चित्रपटाप्रमाणे दाखवून अनेकांना गंडवण्याचं प्रकार टोरेसने केला आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे.

दादरमधील टोरेस या गुतंवणुक कंपनीने लाखो मुंबईकरांना चुना लावण्यानंतर आता मुंबईतील सर्व गुतंवणुक करणाऱ्या कंपन्यांनी झाडाझडती मुंबई पोलिस घेणार आहे. मुंबई आणि परिसरातील सर्वच गुंतवणुदार कंपन्यांची माहिती जमा करण्याचे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत.

काही संशयास्पद आढळल्यात अशा कंपन्यांवर त्वरीत कारवाई करा, असे आदेश फणसाळकर यांनी दिल्याची माहिती आहे. टोरेस कंपनीच्या गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास योग्य दिशेने केला नाही, पोलिसांच्या या कामकाजाबाबत फणसाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुमारे एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळा प्रकरणाचा भांडाफोड मुंबईतील भाजीपाला विक्रेता आणि व्यापारी प्रदीपकुमार वैश्य यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उघडणकीस आला आहे. त्यांच्या तक्रारी देऊन पोलिसांना माहिती दिली. त्यांचे टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात 14 कोटी अडकले आहेत.

टोरेस कंपनीमध्ये कर्मचारी पळून जाण्याच्या तयारीत असताना येथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने प्रदीपकुमार यांना ही माहिती दिली. प्रदीपकुमार यांनी दादर येथील टोरेसचे कार्यालय गाठले. त्यांनी पोलिसांना फोन करुन यांची माहिती दिली.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दादरच्या टोरेस कार्यालयावर छापा टाकला. त्यांना अंदाजे ३ कोटीची बक्कळ रक्कम सापडली. काही भेटवस्तू, गिफ्ट व्हाऊचरही सापडले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT