India Meeting  Sarkarnama
मुंबई

India Meeting in Mumbai: सहा मुख्यमंत्री, 28 राजकीय पक्ष, 63 नेते; मुंबईत दोन दिवस VIP 'मूव्हमेंट'

India Alliance News: 'इंडिया' आघाडीची मुंबईत पुढील दोन दिवस बैठक पार पडणार आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक पुढील दोन दिवस मुंबईत असणार आहे. या बैठकीसाठी देशातील तब्बल 28 राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि नेते उपस्थित असणार आहेत. 'इंडिया'च्या या बैठकीचा मोठा 'माहोल' मुंबईत तयार झाला आहे. या बैठकीसाठी तब्बल 28 राजकीय पक्ष, 63 दिग्गज नेते आणि जवळपास सहा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. त्यामुळे मुंबईत पुढील दोन दिवस 'व्हीआयपी मूव्हमेंट' असणार आहे.

विरोधी बाकांवरच्या नेत्यांची टीम 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून मोदी-शाहांना थेट आव्हान देण्याच्या तयारीत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांचा अजेंडा या दोन दिवसांच्या बैठकीत ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदी-शाहांविरोधात विरोधक नेमकी कशी मोट बांधतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

'इंडिया'च्या या बैठकीसाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेते बुधवारीच दाखल झाले आहेत. एम.के.स्टॅलिन (तामिळनाडू), नितीशकुमार (बिहार), हेमंत सोरेन (झारखंड), अरविंद केजरीवाल (दिल्ली), भगवंत मान (पंजाब) हे देखील उपस्थित राहणार आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येने महत्वाच्या राजकीय व्यक्ती मुंबईत येणार असल्याने बैठक असणाऱ्या हॉटेल परिसराला देखील छावणीचे स्वरूप आले असून मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 'इंडिया' आघाडीच्या या बैठकीचे आयोजक यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आहेत. ही बैठक यशस्वी पार पडण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते धावपळ करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT