Cyrus Poonawalla on Pawar : शरद पवारांना मित्राचा प्रेमाचा सल्ला; म्हणाले, '' ...म्हणून त्यांनी राजकारणातून आता रिटायर व्हावे! ''

Political News : '' शरद पवारांनी दोनवेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली...''
Cyrus Poonawalla on Sharad Pawar
Cyrus Poonawalla on Sharad PawarSarkarnama

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सर्वेसर्वा सायरस पुनावाला हे एकमेकांचे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. दोघेही जण आपआपल्या क्षेत्रात यशाच्या सर्वोच्च पदाला गवसणी घालून कायमच चर्चेत राहणारे आहे. पण त्यांची ही मैत्री आजतागायत टिकून आहे.

आता सायरस पुनावाला यांनी आपल्या मित्राला अर्थात शरद पवारांना महत्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी 'शरद पवारांनी (Sharad Pawar) दोनवेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. ते खूप हुशार व्यक्ती आहेत. पण आता त्यांचे वय झाले असून पवारांनी आता रिटायर व्हावे असा प्रेमाचा सल्ला सायरस पुनावाला यांनी दिला आहे.

Cyrus Poonawalla on Sharad Pawar
Pankaja Munde Daura: दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय; कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला

सायरस पुनावाला यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी 'सिरम लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस आणणार असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शरद पवारांबाबत मोठं विधान केले आहे. पुनावाला म्हणाले, 'शरद पवारांनी दोनवेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली. ते खूप हुशार व्यक्ती आहेत. पण त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे. त्यांचे वय झाले, माझे वय झाले आहे. आता त्यांनी आराम करायला हवा असेही त्यांनी सांगितले.

पवार - पुनावाला यांच्या मैत्रीचा बंध आजही कायम...

शरद पवार आणि सायरस पूनावाला( Dr Cyrus Poonawalla)हे 'बीएमसीसी'मध्ये कॉमर्स शाखेत 1958 ते 1962 कालावधीत एकत्र होते. तेव्हा जुळलेले त्यांचे मैत्रीचे बंध आजही कायम आहेत. शरद पवार यांना त्यांचे सर्व मित्र हे पवारसाहेब, म्हणून हाक मारतात. पण शरद पवार यांना एकेरी नावाने म्हणजे 'शरद' म्हणून हाक मारणारे सायरस पूनावाला हे एकमेव आहेत. इतकी त्या दोघांची मैत्री घट्ट आहे.

Cyrus Poonawalla on Sharad Pawar
Uddhav Thackeray News : उध्दव ठाकरेंनी शरद पवारांचा 'तो' हिशेब चुकता केला...? 'मुंबई' महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा पुन्हा छेडला

अजितदादा पवारांच्या पंतप्रधानपदाच्या संधीवर काय म्हणाले होते...?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळी आधी आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar) यांनी शरद पवारांनी वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्त व्हावे असे विधान केले होते. तसेच दोन ते तीनवेळा पंतप्रधान होण्याची संधी होती, मात्र, काँग्रेसमुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असेही ते म्हणाले होते. आता पुन्हा एकदा सायरस पुनावाला यांनी देखील शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे पवारांच्या पंतप्रधानपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पवार आपल्या मित्राचा सल्ला मनावर घेणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com