Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधूंचा वचननामा पहिल्याच दिवशी अडचणीत, कायद्याच्या कचाट्यात अडकणार?

Uddhav-Raj Thackeray manifesto : वचननामा चुकीचा असल्याचे सांगत त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Rajanand More

Model Code of Conduct violation : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वचननामा प्रसिध्द करण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात एकत्रित येत ‘मुंबईसाठी शिवशक्तीचा वचननामा’ मांडला. ‘ठाकरेंचा शब्द’ अशी टॅगलाईन असलेल्या या वचननाम्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहेत.

ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिध्द केल्यानंतर काही मिनिटांतच त्यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘आरोपपत्रा’च्या माध्यमातून प्रहार केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक माजी खासदार राहुल शेवाळे आणि मंत्री आशिष शेलार यांनीही वचननाम्यावरून ठाकरे बंधूंना घेरले. आरोपांची फैरी झडत असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर मुद्दा पुढे करत थेट वचननाम्यावरच आक्षेप घेतला.

वचननामा चुकीचा असल्याचे सांगत त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, वचननामा चुकीचा आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने कोणतेही कायदेशीर अधिकार, अर्थसंकल्पीय मंजूरी किंवा आर्थिक परिणामांचे प्रकटीकरण न करता देण्यात येत आहेत. खोटी आश्वासने खोटी अमिषे दाखविली जात आहेत.

गुणरत्ने यांनी सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत सांगितले की, सुप्रीम कोर्टाने मोफत सवलतींबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कायदेशीर आधाराविना सार्वजनिक निधीतून सवलती देणे हे संविधान, शासन व आर्थिक शिस्तीला बाधक आहे. राजकीय पक्षांनी निधी स्त्रोत, आर्थिक परिणामही जाहीर करणे बंधनकारक आहे.

वचननामा म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालोसबत केलेला द्रोह आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असा दावा गुणरत्ने यांनी केला आहे. तसेच आपल्या तक्रारीवर अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाने ठाकरे बंधूंना जाहिरानामा सार्वजनिकपणे प्रसारित करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही आयोगाकडे केल्याची माहिती गुणरत्ने यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT