PMC Election : धंगेकर पॅटर्न चालणार की जेलमधून आंदेकर बाजी मारणार? 'या' हायहोल्टेज लढतीत महायुतीतच टशन...

Dhangekar vs Andekar : रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक 23 हा रवींद्र धंगेकर ज्या कसबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक जिंकले होते, त्याच मतदारसंघात प्रभाग येतो.
PMC Election
PMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत कसबा पेठ परिसरातील प्रभाग क्रमांक २३ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रभागात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा धंगेकर आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्यासमोर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर आहेत. त्या दिवंगत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत.

प्रभागात धंगेकर विरूध्द आंदेकर अशी थेट लढत होत आहे. विशेष म्हणजे, सोनाली आंदेकर या सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात जेलमध्ये असून, त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणूक जेलमधून लढवणार आहेत.

याच प्रभागात आंदेकर कुटुंबातील आणखी एक सदस्य लक्ष्मी आंदेकर या देखील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उतरल्या आहेत. दोघींना न्यायालयाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सशर्त परवानगी दिली होती, परंतु जामीन अर्ज फेटाळले आहेत.

PMC Election
Assembly Election : विधानसभा निवडणुकीतही भोपळाही फुटला नाही, आता भाजपला नडणाऱ्या खासदाराला काँग्रेसने आणले पक्षात...

दुसरीकडे आमदारकी लढवल्याने महापालिकेचे निवडणूक लढवायचे नाही या विचारातून रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक 23 हा रवींद्र धंगेकर ज्या कसबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक जिंकले होते, त्याच मतदारसंघात येतो. मात्र ज्यावेळी रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणूक लढली होती. त्यावेळेस आंदेकर कुटुंब हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याने त्यांची मदत धंगेकर यांना झाली होती.

आता आंदेकर त्यांच्या विरोधात असल्याने धंगेकरांसाठी ही निवडणूक थोडी कठीण बनणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षे रवींद्र धंगेकर यांचा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंपर्क आहे. लोकांमधील नेता आणि काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. या सर्वात महत्त्वाच्या जमेच्या बाजू धंगेकर यांच्या आहेत.

PMC Election
BMC Election 2026 : 'नील तू उद्धव काकांना डोळा मारला होता का? मुलाच्या एकतर्फी विजयाची खात्री होताच, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं...

प्रभाग क्रमांक 23 मध्ये बहुसंख्य मुस्लिम मतदार आहे. काँग्रेसमध्ये असताना हा बहुसंख्य मतदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी उभा राहताना पाहायला मिळाला आहे. मात्र आता त्यांनी शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये प्रवेश केल्याने हा मतदार वर्ग नेमकी कोणती भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच ज्या पारंपारिक मतदारसंघातून रवींद्र धंगेकर महापालिकेची निवडणूक लढवायचे त्याचा अत्यंत थोडा भाग या प्रभागामध्ये येत आहे. त्यामुळे धंगेकर यांची ताकद ही मर्यादित असल्याचे बोलले जात आहे.

सोनाली आंदेकर जेलमध्ये असल्याने त्यांना प्रचार करणे कठीण आहे. बँक खाते गोठवलेले असल्याने निवडणूक खर्च आणि प्रचार याबाबत अडचणी आहेत. मात्र यातून आणि त्यांचे पती माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाल्याने काही सहानुभूती सोनाली आंदेकर यांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच या परिसरात आंदेकर कुटुंबाची ज्या पद्धतीने दहशत आहे, त्यातून काही प्रमाणात स्थानिकांना कुटुंबाकडून मदत देखील झालेली आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाचा 'सहानुभूती' किंवा 'भय' घटक काही मतदारांना प्रभावित करू शकतो.

प्रथमदर्शनी प्रभाग क्रमांक 23 मधली ही लढत आंदेकर विरुद्ध धंगेकर जरी दिसत असली तरी. भाजपनेही माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांना उमेदवार दिला असून, ही लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रभागात महायुतीतील तिन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com