Adani Group News Sarkarnama
मुंबई

Adani Group News : धारावी मोर्चावेळी ठाकरेंनी आरोपांची सरबत्ती केल्यानंतर अदानी समूहाचं पत्र; स्पष्ट केली भूमिका

Sachin Fulpagare

Daharavi Redevelopment Project Adani Update : अदानी समूहाला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला. या मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. यावर आता अदानी समूहाकडून एक पत्रक जारी करण्यात आले. या पत्रकातून मोठा दावा करण्यात आला असून एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित झाल्या होत्या, असे अदानी समूहाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पारदर्शक, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोली लावल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले. या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चत झाल्या होत्या, असे अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काहीजणांकडून चुकीची माहिती पसरवण्याचा एकत्रित प्रयत्न सुरू आहे, असे अदानी समूहाने म्हटले आहे. ठाकरे गटाच्या मोर्चानंतर अदानी समूहाकडून हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईत धारावी टी जंक्शन ते अदानी समूहाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालयापर्यंत आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र सरकारने जुलैमध्ये धारावीतील 259 हेक्टर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहातील कंपनीला दिले आहे. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित झाल्या होत्या. 2022 जूमध्ये ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी हे निश्चित झाले होते, असे पत्रकात म्हटले आहे.

बंधने आणि प्रोत्साहनांसह अंतिम अटी, या निविदा प्रक्रियेतील सर्व बोलीदारांना माहीत होत्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे कंपनीला विशेष लाभ पोहोचवण्यात आल्याचा केलेला दावा चुकीचा आहे, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT