Balaji Kinikar, Rajesh Wankhede Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उल्हासनगरमध्ये ठाकरेंचं टेन्शन खल्लास!

Kalyan Loksabha Election : राजेश वानखेडे यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाची बाजू मजबूत...

Bhagyashree Pradhan

Ulhasnagar Political News :

एकेकाळी उल्हासनगर म्हणजे पप्पू कलानी असे समीकरण होते. राजकारणात त्यांचा प्रचंड दबदबा होता. त्याच उल्हासनगरमध्ये कलानी यांच्यानंतर राजेश वानखेडे यांचे नाव घेतले जाते. त्यांची कोणतीही राजकीय हालचाल बालाजी किणीकर यांचे टेन्शन वाढवणारी आहे.

त्यामुळे नुकतेच ठाकरे गटात प्रवेश करणारे राजेश वानखेडे अंबरनाथ विधानसभेत ठाकरे गटाचा उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीमध्येदेखील याचा मोठा फायदा महविकास आघाडीला होऊ शकतो.

उल्हासनगरच्या राजकारणात राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) यांचा मोठा दबदबा आहे. भाजपमध्ये (BJP) असताना ते शहर कार्यकारिणीत महासचिव होते. इतकेच नव्हे, तर ते विरोधी पक्षनेतेपदी होते. पुढे 2014 मध्ये अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून त्यांनी शिवसेनेचे बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांच्या तोंडाला त्यांनी फेस आणला होता. आमदार किणीकर यांना 46 हजार, तर राजेश वानखेडे यांना तब्बल 45 हजार मतदान झाले होते. अवघ्या एक हजार मतांच्या फरकाने किणीकर विजयी झाले होते.

सध्या शिंदेंच्या शिवसेनेत असणाऱ्या बालाजी किणीकर यांना वानखेडे डोईजड होतील, हेच ठाकरे यांनी हेरले आणि वानखेडे यांनीदेखील आपल्याला या पक्षातून आमदारकीची उमेदवारी मिळू शकेल, हे लक्षात घेऊन ठाकरे गटात प्रवेश केला. वानखेडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत येण्यासाठी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेश वानखेडे यांच्या प्रवेशाने अंबरनाथ, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा, तसेच कल्याण लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. वानखेडे हे शहरातील नामांकित तक्षशीला शिक्षण संस्थेचे महासचिव असून सर्वच स्तरांतील लोकांमध्ये त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही या गोष्टीचा फायदा होणार आहे.

आमदार किणीकरांचे टेन्शन वाढले...

2014 च्या विधानसभा निवडणुकीतील आमदार किणीकर यांना टफ फाईट देणारे राजेश वानखेडे आता ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळेच त्यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेने बालाजी किणीकर यांचे टेन्शन वाढले आहे. शिवाय कल्याण लोकसभा निवडणुकीतही (Kalyan Loksabha Constituency) याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT