- जुई जाधव
Uddhav Thackeray : शिवसेना अपात्र आमदारांसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय उद्या विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. दोन्ही बाजूंची साक्ष ऐकल्यानंतर या निर्णयावर येऊन पोहोचले आहेत. उद्याच्या निकालाची आतुरता संपूर्ण देशाला आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून 'प्लॅन बी'ची तयारीदेखील करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार अपात्र निकालाआधीच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र एकंदरीतच ही पूर्ण पत्रकार परिषद बघता उद्याचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने लागणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांना आहे.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जर उद्या निकाल शिंदेंच्या बाजूने दिला, तर आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत, अशा प्रकारचे विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड करणे गैर आहे, हा मुद्दा ग्राह्य धरला जातो, की विधानसभाध्यक्ष त्यांच्या बाजूने निकाल देताहेत हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्याच आधारावर उद्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी द्यावा, अशा प्रकारची एकंदरीत विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत वेळकाढूपणा हा निर्णय देण्यासाठी केला आहे आणि उद्यादेखील ते असेच करून सर्वोच्च न्यायालयाकडे जाण्याच्या तयारीत असतील, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली. एकीकडे हा निर्णय देत असताना लोकशाहीचा खून होऊ नये, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून होताना दिसून आली.
शिवसेनाचा 'प्लॅन बी' तयार ?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात उद्या एक महत्त्वपूर्ण निर्णय विधानसभाध्यक्ष नार्वेकर देणार आहेत. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागला आहे. मात्र उद्याचा निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर लागला तर मात्र शिवसेना नेत्यांनी आम्ही जनतेच्या दरबारी जाऊ, असं वक्तव्य केलं आहे.
उद्याचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याविरोधात लागला तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाला ते चॅलेंज करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊन पुन्हा एकदा याचिका दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे जर उद्याचा निकाल हा शिंदे गटाच्याविरोधात लागला तर शिंदे गटातील नेतेदेखील सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत.
'आम्ही निकालाची वाट पाहू, उद्या निकाल आल्यानंतरच आमची जी काय प्रतिक्रिया आहे ती देऊ,' अशा प्रकारचे विधान शिंदे गटातील नेते करत आहे. त्यामुळे निश्चितच उद्याच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं असताना ठाकरे गटामध्ये मात्र घालमेल दिसून आली.
(Edited bu Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.