Mumbai News : शिंदे सरकार जाणार की राहणार हे उद्या बुधवारी (ता.10) ठरणार आहे. विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना 16 आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहेत. या निकालाकडे ठाकरे आणि शिंदे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून या निकालाबाबत दावे- प्रतिदावे देखील केले जात आहेत. मात्र त्यापूर्वी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)
उद्धव ठाकरे म्हणाले, "आमदार अपात्रतेचं प्रकरण केवळ आमच्यापुरतं नाही, तर देशात लोकशाही राहणार की नाही, हे ठरवणारं हे निकाल आहे. एका रिजनेबल टाईममध्ये याचा निकाल लावावा, असं न्यायालयाने सांगितलं होतं. मात्र, या रिजनेबल टाईमाला काही मर्यादा नव्हती. हा निकाल म्हणजे वेळकाढूपणाचा निर्णय आहे. आता 10 जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिल्यानंतरही ते पुन्हा वेळकाढूपणा करतील."
"लवाद म्हणून विधानसेभेचे अध्यक्ष म्हणून जे बसलेले आहेत, ते दोन वेळा अपत्रातेची टांगती तलवार असलेल्या मुख्यमंत्र्यांना दोन वेळा घरी जाऊन भेटले आहेत. म्हणजे न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटले. आम्ही त्यांच्यावर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला न्याायाची अपेक्षा आहे. मात्र आरोपी आणि न्यायमूर्ती भेटत असतील तर आम्ही कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी? उद्या जर का काही वेडावाकडा निकाल आला किंवा वेडावाकडा अपेक्षित निकाल दिला. त्याच्यामध्ये खरं काय किंवा खोटं काय? हे जनतेलाही कळावं म्हणून त्यांनी कायदेतज्ञ उल्हास बापट यांचेही मत पाहावे," असेही ठाकरे म्हणाले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.