डोंबिवली : शरद पवार (Sharad Pawar) हे राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रॅंगल आहेत, असे म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसे मोठी केली आहेत. त्यांच्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे एक मुर्खपणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांच्यावर केली आहे. ते डोंबिवलीतील लेवा साहित्य सन्मान सोहळ्याला खडसे उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Eknath Khadse Latest News)
शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रॅंगल आहेत. त्यांच्याजवळ गेलेले सगळेच संपतात, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केले आहेत. याबाबत माध्याम प्रतिनिधींनी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, पवार हे बरमुडा ट्रॅंगल आहेत,असे म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसे मोठी केली आहेत. त्यांच्यामुळेच उद्धवजी ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली आणि या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार आले आणि ते चालले देखील. मात्र आता सुरु असलेले राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य नाही,अशी टीकाही त्यांनी सुरु असलेल्या राजकारणावर केली.
दरम्यान, साहित्यावर बोलतांना ते म्हणाले की, साहित्यामध्ये जी काही प्रतिभा आहे. ती एकट्या पुरती किंवा एका समूहा पुरती मर्यादित नसून साऱ्या समूहांनी यामध्ये योगदान दिल्यामुळे साहित्य अधिक प्रगल्भ झालं आहे,अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.