यात आश्चर्य काहीच नाही...मात्र शिंदेंची बाजू वरचढ असेल; फडणवीसांची प्रतिक्रिया...

Devendra Fadnavis : बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी नेहमीच श्रद्धेय राहतील...
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे निवडणूक आयोगाकडून गोठवल्यानंतर यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हे सर्व भाजपच्या इशाऱ्यावर होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. यामुळे त्यांच्या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज 'मातोश्री'वर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे शिवसेनेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना मोदींविषयी केलेल्या वक्तव्याची चर्चा होता आहे. याबाबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News)

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
वाडवडिलांनी जे कमावलं ते मुलांनी एका मिनिटात घालवलं : एकनाथ खडसे

उद्धव ठाकरेंनी आज दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना हे घासलं गेलेलं नाणं आहेत, असा उल्लेख केल्याचं बोललं जात आहे. यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजी यांचं नाणं दाखवूनच निवडून आले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी नेहमीच श्रद्धेय राहतील, मात्र देशात मोदींचं नाणं चालतच राहील, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सुचविले शिवसेनेचे नवे नाव!

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचे अंतरिम आदेश दिले, यात आपल्याला काहीही आश्चर्य वाटलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “याआधी गेल्या २५ वर्षांमध्ये कोणत्याही राज्यात एखाद्या पक्षात फूट पडली आणि निवडणूक आयोगासमोर ते प्रकरण गेलं तेव्हा निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश देत चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवलं आहे. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन कायद्यानुसार ज्याचा हक्क असतो, त्याला ते मिळतं.आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं. मला अपेक्षा आहे की जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल, तेव्हा एकनाथ शिंदेंची बाजू वरचढ ठरेल, असंही मत त्यांनी व्यक्त केले.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena : आमचे चिन्ह गोठले असेल.. रक्त नाही! ठाकरे नावाचे वलय कायम..

दरम्यान, शिवसेना संबधित घडत असलेल्या घडामोडी पाठीमागे भाजपचा हात असल्याची टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली होती. याबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले की, बोलायला आपण काहीही बोलू शकतो. मात्र चॅनलवर कुणीतरी म्हटलं की शिवसेनेनं आता सांगितलेल्या नव्या नावांच्या मागे शरद पवार आहेत. ज्याला जे वाटतं ते तो सांगतो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, ठाकरेंनी 'मातोश्री'वर केल्याल्या संवादामध्ये ही शेवटची निवडणूक असल्याप्रमाणे लढा,असे आवाहन केल्याचं सांगितलं जातयं मात्र, यावर फडणवीस म्हणाले, मागच्या वेळी मी म्हटलं होतं तेव्हा त्यांना याचं फारच वाईट वाटलं. यावर त्यांनी माझीच शेवटची निवडणूक ठरवली होती. मात्र, आता त्यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नसून ज्याला जशी निवडणूक लढायची, तशी लढवा, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com