Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Dasara Melava 2023 : शत्रू देशाशी क्रिकेट खेळणार असाल, तर तुम्हीच मोठे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Uddhav Thackeray Speech Shiv sena Dasara Melava Shivaji Park : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे.

Sachin Fulpagare

Shiv sena Dasara Melava Shivaji Park : काही दिवसांपूर्वीच देशातील विरोधी पक्षाने एकत्र येत इंडिया आघाडी केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हे इंडियन मुजाहिद्दीन आहेत. देशाचे पंतप्रधान जर अशा प्रकारचा आरोप करू शकतात. तुम्ही आमची तुलना देशद्रोह्यांशी करणार असाल आणि शत्रू देशाशी क्रिकेट खेळणार असाल, तर आमच्यापेक्षा मोठे देशद्रोही तुम्हीच आहात, अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसऱ्या मेळाव्यातून टीका केली.

गद्दार त्यांच्या कर्माने जाणार आहेत. त्यांच्या पिढ्यांच्या कपाळावर गद्दार हा शिक्का लागला आहे. छत्रपतींच्या भगव्याशी गद्दारी करणारा महाराष्ट्रात शिल्लक ठेवायचा नाही. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. जो देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा हिंदू आहे. देशाच्या मुळावर असला तो देशद्रोही आहे. कुरुलकरबद्दल संघाची आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका काय? त्याने देशाची गुपितं शत्रूला दिली असेल, तर तो मराठी असला तरी त्याला फासावर लटकवा, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

सध्या क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू आहे. त्यात मधेमधे जाहिराती दाखवत असतात. काही जाहिराती पाठ होतात. एक जाहिरात अक्षय, अजय देवगण, शाहरुख खान आमच्याकडेही तिघेही बसले आहेत. त्यांना कमला पसंत आहे, यांना कमळा पसंत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही अपात्रतेच्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहेत. सर्वोच्च न्यायालय प्रत्येकवेळी यांचे कानफाड फोडते, पण यांचं स्वतःचंच सुरू आहे. तारीख पे तारीख सुरू आहे. तुम्हाला अपात्रतेचा निर्णय लावायचा तेव्हा लावा, पण संपूर्ण देश या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला लवाद जुमानत नसेल तर न्यायालयाचे आणि संविधानाचे अस्तित्व राहणार की नाही आणि लोकशाही टिकणार की नाही याकडे आमचं लक्ष आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT