Uddhav Thackeray Sarakarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : '..तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती' ; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातूनच एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

Mayur Ratnaparkhe

Uddhav Thackeray at Thane News : 'नुसत्या घोषणा देऊन निवडणुका नाही जिंकता येणार. जसं आता हे मिंधे सरकार करत आहे, घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ. आपल्याला नुसत्या घोषणा करून चालणार नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या भगव्या सप्ताहाच्या समोरप प्रसंगी भाषणाची सुरूवात केली.

तसेच, भगव्या सप्ताहाचा आज समारोप होतो आहे. या भगव्या सप्ताहाचं कारण हे दुबार मतदार नोंदणी, आपले मतदार नोंदणी, यादी वाचण हे करण्यासाठीच होतं. असंही यावेळी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'राजन विचारे तुम्ही जे बोललात ते फार महत्त्वाचं आहे. दुबार मतदार नोंदणी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी काही केलं नाही. तीन महिने थांब, मग हे सरकारी जिल्हाधिकारी आणि मिंध्यांचे जिल्हाधिकारी कुठे पाठवतो ते बघा. यांना तुरुंगाचे गज मोजायला लावूयात. ठाणं जे उभा राहिलं आहे, त्यामागे शिवसेना प्रमुखांचं प्रेम, ठाणेकरांचं शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम आणि ठाणेकरांची, शिवसैनिकांची अपार मेहनत. ही मेहनत जर झालीच नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती.'

याचबरोबर 'संजय राऊत तुम्ही नागाची उपमा दिली परंतु मी नागाचा अपमान करू इच्छित नाही. कारण हे तर दुतोंड्या मांडूळ आहेत. कारण, फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो, हे तर सरपटणारे प्राणी आहेत. हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ आहेत. हे लबाडी करून हे जिंकलेले आहेत. ठाणेकरांचं मी कौतुक करायला आलेलो आहे. कारण, सगळं काही पळवलं. जोर जबरदस्ती, पैशांचं वाटप. एवढं करून सुद्धा सव्वा पाचलाख ठाणेकर आपल्यासोबत निष्ठेने आणि प्रेमाने उभा राहिले. आपल्याला सव्वाचार ते साडेचार लाख मतं कल्याणकरांनी दिली आहेत. आपल्या वैशाली राणेंच्या पराभवासाठी शिंदेच्या कारट्याला विश्वगुरुंना आणावं लागलं. हाच तर आपला विजय आहे.'

तसेच 'आपल्याला लबाडी करून काहीही नकोय, जे काय पाहिजे ते हक्काचं आणि प्रेमाचं पाहिजे. विकत भाज्या घेता येतात, आम्हाला मतं विकत नकोय. प्रचंड पैसा ओतून सुद्धा एवढी मतं मिळवली, तरी सुद्धा विजय समोर दिसत नाही म्हणून त्यांनी लबाडी केली. अमोल किर्तीकरांचा पराभव मुंबईत होऊच शकत नाही, ती त्यांनी चोरलेली सीट आहे.' असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

याशिवाय, 'यानंतर ज्या दोन निवडणुका झाल्या एक पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ संपूर्ण मुंबई त्यामध्ये मतदान करते. पदवीधर आणि शिक्षक, आजपर्यंत कधीही जेवढं मतदान झालं नाही तेवढं मतदान या निवडणुकीत झालं आणि प्रचंड मताधिक्क्याने आपल्या शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला उमेदवार त्यांनी निवडून दिला.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT