Video MNS Vs Shivsena UBT : मनसेचा उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा, गाडीवर शेण, बांगड्या फेकल्या

MNS Shivsena UBT :उद्धव ठाकरेंचा ताफा आला असता ठाकरेंच्या ताफ्यात गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शेण फेकल्याची माहिती आहे. गडकरी रंगायातन येथे हा राडा झाला. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती.
MNS Vs Shivsena
MNS Vs Shivsenasarkarnama
Published on
Updated on

MNS Vs Shivsena UBT : राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या होत्या. त्यानंतर आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना महाराष्ट्र सैनिक तुम्हाला एकही सभा घेऊ नाही देणार नाहीत. असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या अवघ्या 8 तासांतच उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील शिवसंकल्प मेळाव्याच्या ठिकाणी राडा घातला.

उद्धव ठाकरेंचा ताफा आला असता ठाकरेंच्या ताफ्यात गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शेण फेकल्याची माहिती आहे. गडकरी रंगायातन येथे हा राडा झाला. उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला ठाणे शहरात ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होतो आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, मनसे कार्यकर्ते गडकरी रंगायतनच्या बाहेर जमा झाले होते. पोलिसांचा देखील बंदोबस्त होता. मात्र, मनसे महिला कार्यकर्ता आक्रमक झाल्या त्यांनी घोषणाबाजी करत गडकरी रंगायतनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

MNS Vs Shivsena
Shivsena UBT : लोकसभेला पराभव तरी ठाकरे गटाकडे विधानसभेसाठी इच्छुकांची रीघ..

उद्धव ठाकरेंचा ताफा जाताना मनसे कार्यकर्त्याने रस्त्याच्या कडेला येत ठाकरेंच्या ताफ्यावर शेण तसेच बांगड्या फेकल्या. 'साम टिव्ही'शी बोलताना मनसेचे अविनाश जाधव यांनी तु्म्ही गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आता सुपारीका जबाब पत्थरसे मिळणार पुढे पुढे बघा काय होतंय, असा इशारा ठाकरे गटाला दिला.

MNS Vs Shivsena
Amol Kolhe News : राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असताना महायुतीचे नेते गप्प का? अमोल कोल्हेंचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com