Nitesh Rane Uddhav Thackeray 1 Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंचंं सगळंच काढलं; म्हणाले, उंची पेंग्विनची,चाल बदकाची अन् आवाज...

Uddhav Thackeray Speech: यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापनदिनी भाजपा,एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाच शिवाय महायुती सरकारमधील मंत्री व वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेते नितेश राणेंची इज्जतच काढली.

Deepak Kulkarni

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा 59 वर्धापन दिन वादळी ठरणार हे बोललं जात होतं.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून हे दोन वेगवेगळे कार्यक्रम पार पडले. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापनदिनी भाजपा,एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाच शिवाय महायुती सरकारमधील मंत्री व वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेते नितेश राणेंची इज्जतच काढली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी गुरुवारी (ता.18) भाजपाचे नेते नितेश राणे यांचा चांगलंच फटकारलं. ते म्हणाले, सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात आहे. भाजपाचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची केवढी,तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही,असा चिमटाही ठाकरेंनी राणे यांना काढला.

ठाकरे म्हणाले,तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय आहे? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे? आणि आमच्यावरती बोलत आहेस, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंचे (Nitesh Rane) अप्रत्यक्षपणे कान टोचले.

कोणता तरी एक बाप ठरवा,याच भाषेत मी त्यांना बोलतोय.हे त्यांना कळू द्या.आज शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच आहे. भगवा एकच आहे.दैवत,विचार एकच असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

आगामी मुंबई महापालिकेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यावर उद्धव ठाकरेंनी सूचक विधान केलं.

शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सगळीकडे बातम्या सुरू आहेत. काय होणार. कसं होणार, होणार की नाही, होणार ते कळेल ना अशी चर्चा आहे. पण यांच्या(राज ठाकरे) मनात आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे. पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागल्याचंही ठाकरे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीस आणि शिंदेंना खडेबोल सुनावताना म्हणाले,हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही,जर का मुंबईवर ताबा मिळाली नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली. अरे आम्ही घेणारच आहोत असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू,अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीस आणि शिंदेंवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT