Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59 वर्धापन दिन सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. यात उद्धव ठाकरे आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसैनिकांना काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती.अशातच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्या नेहमीच्या शैलीतल्या भाषणात पहिल्या पाच मिनिटांतच एकनाथ शिंदेंसह केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारविरोधात पाच शाब्दिक हल्ले चढवले.
1) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना वर्धापन दिनाला शिवसैनिकांची तुडुंब गर्दी पाहून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपला टोला लगावला.ते म्हणाले,ही शिवसैनिकांची गर्दीचा फोटो दाखवा म्हणजे त्यांचे नॅपकिन सह सगळेच कपडे ओले होतील असेही त्यांनी सांगितलं.
2) आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली,त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुलना करताना तुम्हाला लाज वाटली नाही.देशद्रोह्यांसोबत आमची तुलना करता आणि तुम्ही काय केले ते सांगायला आमचेच खासदार जगभर पाठवता.
3)मराठवाड्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनावर भाष्य करतानाच आतापर्यंत भाजपला उद्देशून त्यांनी जे वादे केले होते ते फसवे केले होते.निवडणुकीत त्यांनी जनतेशी वादा यांनी पाळला नाही.मग मला केलेला वादा,अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा तो तरी यांनी कसा पाळला असता.
4) केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सारखं काही न काही घडतंय असंही ठाकरे म्हणाले. त्यांनी म्हणूनच मोदी सरकारला पणवती सरकार असा उल्लेख करत डिवचलं. आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला.रेल्वे अपघात झाला पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मेट्रोत पाणी भरलं, असंही ठाकरे म्हणाले.
5) आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपाला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची गरज नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंह यांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे ? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात असा टोमणा मारला.
6) ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आमच्यावर टीका करतात. अरे तुला पोरं होत नाहीत. आम्ही काय करू. भाजपचे लोक असेच आहेत. आपण सत्य नाकारतो का कधी. त्यांना आजपर्यंत कधी पोरं झाली नाही. म्हणून दुसरे नेते स्वीकारायचे आणि त्यांना मोठं करायचं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.