Uddhav Thackeray & Nitin Gadkari Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray & Nitin Gadkari : ठाकरेंचं ठरलं, नागपूरमध्ये गडकरींच्या पराभवासाठी मोठं पाऊल उचललं; म्हणाले, '' मित्रपक्ष काँग्रेसला...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांसह वरिष्ठ नेतेमंडळींकडून मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे आता माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

याचाच भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघाबाबतही ठाकरे गटाने आगामी निवडणुकीबाबत मोठं पाऊल उचललं असून या ठिकाणी इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला मदतीचा हात पुढे केला आहे

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.

विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं(Nitin Gadkari)चा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा ठाकरे यांच्याकडून आढावा घेतला. वास्तविक या मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्यात येईल अशी शक्यता नाही. मात्र, तरीही त्या बंडखोरांच्या मतदारसंघात उध्दव ठाकरे वातावरण तापवणार असणार असल्याचे चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अखेरच्या दिवशी नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा ठाकरेंनी आढावा घेतला.

वास्तविक या मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार देण्यात येईल, अशी शक्यता नाही. मात्र, तरीही निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून या मतदार संघाचा आढावा ते घेणार आहेत. इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा असा आदेश ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

मित्रपक्षाला बळ देत असतानाच...

ठाकरे म्हणाले, यांनी इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकी(Lok Sabha Election)ला सामोरे जाताना नागपूर लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला बळ देण्याची तयारी ठेवा असा आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मित्रपक्षाला बळ देत असताना आपला पक्षाची संघटनात्मक काम मागे पडू देऊ नका, पक्षबांधणी मजबूत ठेवा अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्ष उमेदवार देईल तर नागपूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला मित्रपक्षाला बळ द्यावे लागेल. त्यामुळे पुढील निवडणुकांची परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष बळकटीसाठी तयारी करा आपला पक्षसुद्धा या लोकसभा मतदारसंघात वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT