Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Amit Thackeray, Raj Thackeray Sarkarnaa
मुंबई

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : तुमच्याकडं ना आमदार ना खासदार, पाठिंब्याचा...; अमित ठाकरेंना 'या' नेत्यानं सुनावलं

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : बिनशर्त पाठिंब्यावरून शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आम्ही पाठिंबा दिल्यामुळेच आदित्य ठाकरे वरळीतून आमदार झाले, असा दावा मनसेचे अमित ठाकरेंनी केला. त्यावर मनसेकडे आहेच काय त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही पाठिंबा मागावा, असे सडेतोड उत्तर ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मनसेने पाठिंबा दिला होता. असे असतानाही राज्यात महायुतीला काही कमाल करता आली नाही. त्यावर वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर Raj Thackeray नाव न घेता कडक शब्दांत टीका केली होती. राज यांचा 'बिनशर्त' पाठिंबा नव्हे 'बिनशर्ट' पाठिंबा, अशी खिल्ली ठाकरेंनी उडवली. यानंतर मनसे युवासेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला होता. आता ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मनसेवर पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण, शत्रू कोण समोर आले आहे. यावेळी काहींनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा! तर काहींनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. ही कला मोदींना चांगली जमते, आम्हाला नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला होता.

अमित ठाकरेंचे प्रत्युत्तर..

पाच वर्षापूर्वी वरळीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळी त्यांना काही वाटले नाही. त्यावेळी त्यांनी पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार केले. या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरी त्यासाठी मेहनत घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी काका उद्धव ठाकरेंना Uddhav Thackeray सुनावले होते.

ठाकरे गटाचा पलटवार

अमित ठाकरेंच्या Amit Thackeray टीकेला ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी उत्तर दिले आहे. मनसेचे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असे झाले आहे. तुमच्याकडे कुणी पाठिंबा मागितला होता. तुमच्याकडे आहे तरी कोण? मत, मतदार, नेते आहेत का, कार्यकर्ते आहेत का, नगसेवक, आमदार, खासदार आहेत का? शिल्लक राहिलेल्या मनसेकडे कोण पाठिंबा मागणार? आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज नाही. गरज आहे त्यांना द्या. वरळी शिवसेना ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. तेथील लोकांचे आदित्य ठाकरेंवर प्रेम करतात, असे म्हणत दुबेंनी अमित ठाकरेंवर टीक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT