Nashik Teachers Constituency Election: भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का; नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा ?

BJP Support to Eknath Shinde Shivsena Candidate In Nashik Teachers Constituency Election : नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Eknath Shide, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Eknath Shide, Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीत खटक्यावर खटके उडत आहे.भाजप, शिवसेनेसह (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अपयशाचं खापर एकमेकांवर फोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सत्तेतील एन्ट्रीवरुनही आता शिंदे गटाने उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. तर अजित पवार गटाकडूनही या नाराजीवर तितकीच टोकदार प्रतिक्रिया दिली गेली.

यावरुन महायुतीत अजित पवारांना (Ajit Pawar) एकटे पाडले जात असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असतानाच आता दुसरीकडे भाजपने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराऐवजी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांमध्ये काँटे की टक्कर सुरू असून भाजपच्या पाठिंब्यावर विजयाची समीकरणं अवलंबून आहे.

दोन्हीही उमेदवारांनी निवडणुकीसाठी दंड थोपटलं आहे.अशातच भाजपने (BJP) शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.नाशिक शिक्षक मतदारसंघात प्रभारी म्हणून मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यांनी किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार असा उल्लेख केला आहे.

Eknath Shide, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Abdul Sattar On Manoj Jarange : 'मनोज जरांगे हे मराठा समाजाचे आयकॉन, निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार' ; सत्तारांचं विधान!

तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नाशिकमधून छगन भुजबळ तर जळगावमधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाचा उमेदवाराची जबाबदारी दिली आहे.भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

महेंद्र भावसार काय म्हणाले..?

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांनी भाजपने शिंदे गटाचे किशोर दराडे यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, अजित पवार गटाकडून मी माझ्या पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिकची लढत ही मैत्रीपूर्ण आहे.पण कुठल्या दबावामुळे अशी वेगवेगळ्या पक्षांच्या पाठिंब्याची पत्रं काढले जात आहे, हा एक गंभीर विषय असल्याचेही भावसार यांनी सांगितले.

तर समोरच्या उमेदवारांना पराभव दिसत असल्याने अशाप्रकारची वेगवेगळी पत्रं गोळा केली जात आहे.मात्र,अशी पत्रक काढणं आणि छुपा पाठिंबा देत तळागळातील कार्यकर्त्यांनी काम करणं यात मोठा फरक आहे असल्याची भावना व्यक्त करतानाच भावसार यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

Eknath Shide, Ajit Pawar, Devendra Fadnavis
MVA Seat Sharing Update : कोण मोठा भाऊ नाही, कोण छोटा! विधानसभेसाठी 'असा' असणार 'मविआ' चा जागावाटप फॉर्म्युला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com